बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

नाशिक : बिहारमध्ये परस्पर तेजस्वी सरकारची घोषणा; पण महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसची आघाडी होणार ही नुसतीच घोषणा झाली. परंतु अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. पण त्यापूर्वीच तेजस्वी यादव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वतःलाच मुख्यमंत्री म्हणून जाहीर करून घेतले. बिहारमध्ये “तेजस्वी सरकार” बनल्यानंतर बिहार मधल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणा करून टाकली. बिहार मधला प्रत्येक युवक तेजस्वी बरोबरच बिहारचे सरकार चालवेल. ते कुठलाही एक किंवा दोन-तीन पक्ष मिळून चालवणार नाहीत, तर बिहारचे सगळे युवक तेजस्वीच्या बरोबरीने सरकार चालवतील, अशी आकर्षक घोषणा तेजस्वी यादवांनी केली.

पण पत्रकार परिषदेत त्यांनी कुठल्याही राजकीय प्रश्नाला उत्तर न देता ते निघून गेले. त्यामुळे बिहारमध्ये महागठबंधन मधली दरी बुजवली गेली की विस्तारली??, हा सवाल कायम राहिला.

– माध्यमांचा परस्पर फॉर्म्युला

बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होऊन सुद्धा अजून महागठबंधन मधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला नाही. माध्यमांनी त्याच्या वेगवेगळ्या बातम्या दिल्या. त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाला 130, काँग्रेसला 55, डाव्या पक्षांना 35, आणि छोट्या पक्षांना 20 अशा जागा परस्पर देऊन टाकल्या. परंतु या सगळ्यात राष्ट्रीय जनता दल मात्र लंगडे झाले. कारण 243 पैकी फक्त 130 जागांवर लढवून राष्ट्रीय जनता दलाला सन्मानजनक जागा मिळायचीही शक्यता महागठबंधनचा फॉर्म्युला परस्पर जाहीर करणाऱ्या माध्यमांनी ठेवला नाही.

– राहुलचा डाव; तेजस्वीचा प्रतिडाव

महागठबंधनचे जागावाटप अंतिम करण्यासाठीच काँग्रेसने दोन माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांना तेजस्वी यादव यांना पटवण्यासाठी त्यांच्या घरी पाठवायचा निर्णय घेतला. ते आज सायंकाळी 5.00 वाजता तेजस्वी यादवांच्या घरी जाऊन त्यांना भेटणार आहेत. परंतु त्यापूर्वी आज दुपारीच तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहारमध्ये तेजस्वी सरकार येणार असल्याचे जाहीर करून घेतले. तेजस्वी यादवांनी सुरुवातीला राहुल गांधींबरोबरच्या यात्रेत राहुल गांधींचे पंतप्रधानपद “कबूल” केले. परंतु राहुल गांधींनी तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्रीपद “कबूल” केले नव्हते. तेजस्वी यादवांच्या ऐवजी त्यांनी कन्हैया कुमारचे ब्रॅण्डिंग करायचा प्रयत्न केला होता. पण राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी बिहारी जनतेने मतदान करावे, असे आव्हान तेजस्वी यादव यांनी केले होते. परंतु राहुल गांधींनी तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता. त्यानंतर महागठबंधनचे जागावाटप रखडले. ते अजूनही जसेच्या तसे कायम आहे.

– काँग्रेसची पुरती गोची

मात्र तेजस्वी यादव यांनी मात्र तेजस्वी यादव यांनी आज काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री आपल्याला भेटायला येण्याच्या अगोदरच पत्रकार परिषद घेऊन “तेजस्वी सरकार” जाहीर करून घेतले. यातून त्यांनी काँग्रेसची कोंडी केली. आता महागठबंधन करायचे असेल, तर तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्रीपद जाहीर करावे लागेल आणि मगच महागठबंधनची फायनल जागावाटपाची आघाडी जाहीर करावी लागेल, अशी काँग्रेसची गोची झाली आहे.

Tejasvi Yadav declares himself as a chief minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात