सीबीआय कार्यालयात पोहोचल्यानंतर तेजस्वी यादव यांनी दिली आहे प्रतिक्रिया, म्हणाले…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आज दिल्लीत सीबीआयसमोर ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात चौकशीसाठी हजर झाले आहेत. सीबीआयने त्यांना यापूर्वी तीन वेळा समन्स बजावले होते, मात्र पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते चौकशीसाठी गेले नाहीत. त्याच वेळी, तेजस्वी यादव यांची बहीण आणि आरजेडीच्या राज्यसभा खासदार मीसा भारती यांनाही ईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. Tejashwi Yadav at CBI office for questioning in Land For Job case ED summons Misa Bharti
Between the lines : प्रादेशिक नेत्यांची चिकाटी; काँग्रेसला मागे ढकलण्याची अखिलेश – ममता – कुमारस्वामींची नवी खेळी!!
सीबीआय कार्यालयात पोहोचल्यानंतर तेजस्वी यादव यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीपासूनच तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे. ‘’तुम्ही देशाचे वातावरण तुम्ही पाहत आहात, झुकणे सोपे आहे पण लढणे खूप कठीण आहे. आम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत.’’ असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.
दिल्ली: बिहार के उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सीबीआई दफ्तर के लिए रवाना हुए। जमीन के बदले नौकरी घोटाला मामले में पूछताछ के लिए तेजस्वी यादव सीबीआई के सामने पेश होंगे। pic.twitter.com/qqC8hSbn9n — ANI_HindiNews (@AHindinews) March 25, 2023
दिल्ली: बिहार के उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सीबीआई दफ्तर के लिए रवाना हुए।
जमीन के बदले नौकरी घोटाला मामले में पूछताछ के लिए तेजस्वी यादव सीबीआई के सामने पेश होंगे। pic.twitter.com/qqC8hSbn9n
— ANI_HindiNews (@AHindinews) March 25, 2023
जमिनीच्या मोबदल्यात नोकरी असा हा घोटाळा तेव्हाचा आहे, जेव्हा लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सीबीआयाने लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांच्यासह अन्य १४ जणांविरोधात नोकरी घोटाळ्यात आरोपपत्र दाखलव केले होते. याशिवाय सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे सचिव संजय यादव यांची दिल्लीत चौकशीही केली होती.
दिल्ली: राजद नेता मीसा भारती ईडी दफ्तर के लिए रवाना हुईं। नौकरी के लिए जमीन मामले में पूछताछ के लिए मीसा भारती ईडी के सामने पेश होंगी। pic.twitter.com/NnI2eGsym0 — ANI_HindiNews (@AHindinews) March 25, 2023
दिल्ली: राजद नेता मीसा भारती ईडी दफ्तर के लिए रवाना हुईं।
नौकरी के लिए जमीन मामले में पूछताछ के लिए मीसा भारती ईडी के सामने पेश होंगी। pic.twitter.com/NnI2eGsym0
लँड फॉर जॉब प्रकरण काय आहे? –
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी १८ मे रोजी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुली मिसा आणि हेमा यादव यांच्यासह २००८-२००९ मध्ये मुंबई जबलपूर, कोलकाता, जयपूर, हाजीपूरमध्ये रेल्वेत नोकरी मिळालेल्या १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रेल्वेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने २३ सप्टेंबर २०२१ रोजी प्राथमिक तपास केला होता. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी अर्ज केल्याच्या तीन दिवसांच्या आत ड श्रेणीतील पदांवर पर्यायी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या बदल्यात उमेदवारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन हस्तांतरित केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App