Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शिक्षकाला अटक

Pahalgam attack

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : Pahalgam attack  पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी केली. हा आरोपी शिक्षक असून काही दिवसांपूर्वीच दहशतवायांच्या संपर्कात आला होता.Pahalgam attack

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव युसूफ कटारिया आहे. २६ वर्षीय हा तरुण कुलगामचा रहिवासी आहे.Pahalgam attack

आरोपी युसूफने हल्ला करणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) दहशतवाद्यांना विविध प्रकारे मदत केली होती. कटारिया हा स्थानिक मुलांना शिकवत असे. काही दिवसांपूर्वी तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्यांना मदत करू लागला. ऑपरेशन महादेवमध्ये जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांच्या तपासादरम्यान पोलिसांना कटारियाबद्दल माहिती मिळाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यापूर्वीही त्याने कुलगामच्या जंगलात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याचे उघड झाले.Pahalgam attack



ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रांच्या तपासातून कटारीची अटक झाली. जूनच्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांना अटक केली होती.

लष्कर कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. २८ जुलै रोजी झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये हे तीन दहशतवादी मारले गेले.

२२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य केले. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बायसरन खोऱ्यात घडली.

Teacher arrested for helping terrorists involved in Pahalgam attack

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात