विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात मोदी सरकार विरोधात शेतकरी आंदोलन झाले, त्यावेळी अर्बन नक्षल्यांनी दिल्लीचा घेराव केला होता. देशाच्या विविध भागातून दिल्लीत येणारे रस्ते बंद करून टाकले होते. त्यामुळे संपूर्ण देशात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. आता तशाच प्रकारचे आंदोलन करून दिल्लीला घेराव घालण्याची चिथावणी इत्तेहाद ए मिल्लत परिषदेचे प्रमुख इस्लामी धर्मगुरू मौलाना तौकीर रजा खान यांनी मुस्लिमांना दिली. Taukeer Raj’s incitement to Muslims
25 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात वक्फ बोर्ड सुधारणा कायदा विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. त्या विरोधात देशातल्या सर्व मुसलमानांनी एकत्र येऊन संपूर्ण दिल्लीला घेराव घालावा. मग कुणाच्या बापाची मुसलमानांच्या संपत्तीवर हक्क सांगण्याची हिंमत होणार नाही, असे चिथावणीखोर वक्तव्य मौलाना तौकीर रजा यांनी जयपूर मध्ये केले.
British Prime Minister : ब्रिटीश पंतप्रधानांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; दिवाळीच्या उत्सवात मांसाहार आणि दारू दिली; हिंदू संघटनांचा आक्षेप
मौलाना तौकीर रजा म्हणाले :
– कुणाच्या बापाची औकात नाही की आमची संपत्ती जप्त करेल. आमची संख्या का लपवता?? ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा आत्मा कापेल. आमते तरुण घाबरट नाहीत. आम्ही आमच्या तरुणांना नियंत्रणात ठेवलं आहे. ज्या दिवशी ते तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, त्यांना रोखणं तुमच्या अवाक्यात नसेल.
– संसदेच सत्र सुरु होतय. जर, तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल, तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करुन हव्या असतील तर तुम्हाला दिल्लीला यावं लागेल. तुम्ही दिल्लीत येऊन तुम्हाला जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न केला, तर तसं घडेल. पण जर तुम्ही देखावा करत बसाल, तर काही होणार नाही.
– सरकार बेईमान आहे. कुरान आणि अल्लाहच अपमान करणार सरकार सत्तेवर आहे. जर, तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिल्लीला या, माझी विनंती आहे. आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कुणाच्या बापामध्ये ताकद नाही.
– आम्ही आधी तिरंगा घेऊन येणार. जर ते ऐकले नाहीत तर प्रशासनाकडे जाणार. त्यानंतर जे होईल, ते ठरवण तुमची जबाबदारी असेल. आमची संख्या का लपवता? ज्या दिवशी रस्त्यावर उतरु तुमचा आत्मा कापेल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App