नाशिक : भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी टाटांनी पुढाकार घेतला असून त्यांनी अन्य भारतीय कंपन्यांनाही सहकार्याचा हात पुढे केला आहे. कारण भारतीय संरक्षण क्षेत्र केवळ मागणी आणि व्यापार एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर भारताची संरक्षण क्षमता जगात वाढविणे, भारताच्या वाढत्या गरजेनुसार संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतात करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, अशा शब्दांमध्ये टाटा संस्थेचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी टाटा सुमूहाची भूमिका स्पष्ट केली. नागपूर मध्ये सोलर सिस्टिम उद्योगाच्या पाहणीसाठी गेले होते.Tata’s initiative to increase Indian defense material production
मागणी आणि व्यापार संकल्पनांच्या पलीकडे
यावेळी चंद्रशेखरन यांनी मागणी आणि व्यापार या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन भारतीय संरक्षण क्षेत्राच्या आवश्यकता आणि क्षमता यांचे वर्णन केले. भारतीय संरक्षण क्षेत्र सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र आहे. भारताच्या संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी उत्पादन क्षमता वेगाने वाढल्या पाहिजेत. हे कुणा एका व्यक्तीचे किंवा कंपनीचे काम नाही. त्यासाठी अनेक कंपन्यांनी आणि संस्थांनी एकत्र आले पाहिजे. जिथे आवश्यकता वाटेल, तिथे हातमिळवणी केली पाहिजे. त्यासाठी टाटा समूह कायम तयार असेल. कारण ही केवळ व्यापार आणि मागणी अशा संकल्पनांमध्ये बसणारे क्षेत्र नाही. हे त्यापलीकडचे व्यापक क्षेत्र आहे. भारताची संरक्षण सिद्धता वाढविण्यासाठी छोटातल्या छोट्या गोष्टींपासून ते मिसाईल, ड्रोन्स, लढाऊ विमाने यांच्या उत्पादनांची वाढती गरज आहे. ती पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी क्षमता वाढवली पाहिजे. ही क्षमता वेगवेगळ्या कंपन्यांनी आणि संस्थांनी एकत्र येण्यानेच वाढेल. कारण हे कुठल्याही एकट्या कंपनीचे काम नाही, असे चंद्रशेखरन म्हणाले.
व्यापारी दृष्टिकोनाच्या पलीकडचे
भारतीय संरक्षण क्षेत्राकडे टाटा समूह केवळ व्यापारी दृष्टिकोनातून पाहत नाही. आगामी चार महिन्यांमध्ये किती व्यापार वाढवायचा, वर्षभराचा व्यापार कशा पद्धतीने पुढे न्यायचा, अशा संकुचित दृष्टिकोनातून टाटा समूह संरक्षण क्षेत्राचा विचार करत नाही. त्या उलट भारताची संरक्षण सिद्धतेची गरज काय आहे?, तिची क्षमता कशी वाढली पाहिजे? त्यासाठी कुठली क्षेत्रे कोणी निवडली पाहिजेत?, तिथे उत्पादन कसे वाढविले पाहिजे?, गुणवत्ता कशा पद्धतीने टिकवली पाहिजे?, अशा व्यापक दृष्टिकोनांमधून टाटा समूह संरक्षण क्षेत्राचा विचार करतो, याकडे चंद्रशेखरन यांनी लक्ष वेधले.
टाटा समूहाचे वैशिष्ट्ये
इथेच टाटा उद्योग समूहाचे इतर उद्योग समूहांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य दिसून आले. टाटांनी भारतीय उद्योगाला वाढविताना नेहमीच देशहिताला अधिक प्राधान्य दिले. भारतीय व्यवस्था, सेवा आणि उत्पादनांना प्रोत्साहन दिले. टाटा उद्योग सुमूहाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करताना तो देशहिताच्या दृष्टिकोनापेक्षा वरचा ठेवला नाही, तर तो व्यावसायिक दृष्टिकोन देशहिताच्या दृष्टिकोनाच्या बरोबरीने विकसित केला. ही परंपरा गेल्या सव्वाशे वर्षांपासून कायम राहिली. “मेक इन इंडिया” धोरणाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देताना टाटा समूह नेहमीच सक्रिय राहिला. चंद्रशेखर यांच्या आजच्या वक्तव्यातून टाटा समूहाच्या वैशिष्ट्याचे प्रतिबिंब दिसले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App