विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी मार्च २०२१ मध्ये नागरी हवाई उड्डाण मंत्री हर्दिप सिंह पुरी यांनी एअर इंडियाचा शंभर टक्के हिस्सा विकला जाईल असे जाहीर केले होते. एअर इंडियाची बोली लावण्यासाठी कंपन्यांना ६४ दिवसाचा कालावधी दिला होता. गृहमंत्री अमित शहा व दोन मंत्र्यांची समिती यासाठी नेमली गेली होती. एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बॉली अखेरीस टाटा सन्सने जिंकली आहे. अशी माहिती ब्लूमबर्ग कडून मिळालेली आहे.
Tata sons won bid to take over Air India? DIPAM secretary denies the news
मनी कंट्रोल या वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, मंत्र्यांच्या पॅनलने टाटा सन्सकंपनीचे एअर इंडिया घेण्याचे प्रपोजल स्वीकारले आहे. एविएशन मिनिस्ट्रीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनी कंट्रोल या वृत्तवाहिनीने सांगितले की, टाटा सन्स हीच सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी होती. टाटांनी सर्वात जास्त रकमेची बोली लावली आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच घेतला जाईल आणि जाहीर केला जाईलं.
Tata group ची ई-बिझनेसमध्ये उंच उडी, 9500 कोटी रुपयांच्या करारामुळे मुकेश अंबानींच्या चिंतेत भर!
तर CNBC TV १८ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार एअरलाइन्स कंपनी नवीन व्यवस्थापनाकडे म्हणेज टाटा सन्सकडे डिसेंबर पर्यंत सोपवण्यात येईल. मनी कंट्रोलनी यां बातमीची खात्री करून घेण्यासाठी टाटा सन्स कंपनी सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
DIPAM (डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट) चे सेक्रेटरी तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की, याबाबत फायनल निर्णय घेतल्यावर माध्यमांना सूचित केले जाईलं. टाटा सन्सने ही बोली जिंकली ह्या बातम्यात काही तथ्य नाही असेही त्यांनी ह्या वेळी सांगितले.
जे.आर.डी. टाटा यांनी केवळ दोन लाखाच्या भांडवलावर सुरू केलेली ही कंपनी आता परत टाटा समूहामध्ये सामील होऊ शकेल. १९५३ मधे एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App