income tax department : प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चेन्नईच्या बाहेरील पयानूर गावात अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) च्या अंतरिम सरचिटणीस व्हीके शशिकला यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बेनामी व्यवहार (प्रतिबंध) अधिनियम, 1988 अंतर्गत ही नियमित पाठपुराव्याची कारवाई आहे. tamil nadu income tax department attaches sasikalas assets worth 100 crore
वृत्तसंस्था
चेन्नई : प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चेन्नईच्या बाहेरील पयानूर गावात अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) च्या अंतरिम सरचिटणीस व्हीके शशिकला यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बेनामी व्यवहार (प्रतिबंध) अधिनियम, 1988 अंतर्गत ही नियमित पाठपुराव्याची कारवाई आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, एक बंगला आणि त्याच्याशी संलग्न एकूण 49 एकर जमीन आयटी विभागाने ताब्यात घेतली आहे, जी 1994 मध्ये खरेदी करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी या मालमत्तेच्या कब्जासंदर्भातील सरकारी आदेश बंगल्याच्या गेटवर चिकटवला आहे. 2014 मध्ये, कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल कुन्हा यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता, शशिकला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य इलवारसी आणि सुधाकरन यांच्या मालमत्तांचा बेहिशेबी मालमत्तांच्या यादीत समावेश केला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर तेव्हापासूनच प्राप्तिकर विभाग त्यांच्या मालमत्ता जप्त करत आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाने चेन्नईच्या पोझ गार्डनमध्ये जयललिता यांच्या घरासमोर असलेल्या शशिकला यांच्या मालकीचा एक निर्माणाधीन बंगला ताब्यात घेतला. 2016 मध्ये जयललिता यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कुन्हा यांचा आदेश कायम ठेवला आणि शशिकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना फेब्रुवारी 2017 मध्ये चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच वर्षी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शशिकला AIADMK मध्ये त्यांची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हीके शशिकला AIADMK च्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जात होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांची सरचिटणीस म्हणून निवड केली, पण नंतर त्यांना पदावरून काढून टाकले. 2017 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा पुतण्या टीटीव्ही दिनाकरण सोबत मिळून त्यांनी 2018 मध्ये अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (AMMK) ची स्थापना केली. या पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत.
tamil nadu income tax department attaches sasikalas assets worth 100 crore
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App