तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भाषण स्फोट; तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू!


 पंतप्रधान मोदींनी मृतांचे कुटुंबीय आणि जखमींसाठी केली आर्थिक मदतीची घोषणा

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात शनिवारी (२९ जुलै) फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी नुकसान भरपाईही जाहीर केली आहे. Tamil Nadu crackers factory blast Eight people including three women died

अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले की, कृष्णगिरीतील फटाका कारखान्याची दुर्घटना दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे जाहीर केले

पंतप्रधान मोदी म्हणाले, “तामिळनाडूच्या कृष्णागिरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेली दुर्घटना दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या भावना आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशीही मनोकामना व्यक्त करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची अनुग्रह रक्कम दिली जाईल. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णागिरी जिल्ह्यातील पझायापेट्टई येथील फटाका कारखान्याच्या गोदामात अचानक स्फोट झाल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. स्फोटामुळे परिसरातील काही दुकाने आणि घरांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून नेण्यात येत आहे.

Tamil Nadu crackers factory blast Eight people including three women died

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात