
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : #Fairdealmitation च्या नावाखाली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी घेतलेल्या बैठकीकडे बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठच फिरवल्याचे चित्र समोर आले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री स्टॅलिन अण्णा यांच्या बैठकीला हजरच राहिले नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे तीनच मुख्यमंत्री स्टॅलिन अण्णा यांच्या बैठकीला हजर राहिले. बाकीच्या राज्यांमधले दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतले नेते बैठकीत दिसले.
लोकसभेची संख्यात्मक फेररचना करताना मोदी सरकार दक्षिणेतल्या राज्यांचे लोकप्रतिनिधित्व घटवेल म्हणजेच तिथले खासदार कमी करेल आणि उत्तरेतले खासदार वाढवेल, अशी काल्पनिक भीती दाखवून स्टॅलिन यांनी दक्षिणेतल्या पूर्वेतल्या आणि उत्तरे त्या छोट्या आणि मोठ्या राज्यांची बैठक बोलावली. ती बैठक आज चेन्नईमध्ये झाली. तामिळ माध्यमांमध्ये त्या बैठकीचा फार मोठा गाजावाजा झाला. या बैठकीच्या निमित्ताने स्टालिन अण्णांचे नेतृत्व देशपातळीवर जाईल, याची चर्चा तामिळ माध्यमांनी केली. पण ही चर्चा बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गैरहजर राहून पंक्चर करून टाकली.
#WATCH | Chennai: Tamil Nadu CM MK Stalin felicitates CMs of states as well as leaders from various parties who are attending the meeting on delimitation.
(Video Source: Tamil Nadu DIPR) pic.twitter.com/LuTZN57zQy
— ANI (@ANI) March 22, 2025
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी स्टालिन अण्णांच्या बैठकीकडे फिरकले देखील नाहीत. यापैकी मोहन चरण माझी हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याने स्टालिन यांच्या बैठकीकडे येणारच नव्हते, पण ममता बॅनर्जी, सिद्धरामय्या किंवा अगदी चंद्राबाबू नायडू यांचे मात्र तसे नव्हते. ते विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री असून देखील त्यांनी स्टालिन अण्णांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. सिद्धरामय्या यांनी आपल्या ऐवजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बैठकीला पाठविले. पश्चिम बंगालने कुठले प्रतिनिधी पाठवली की नाही याविषयी माहिती समोर आली नाही. तेलंगणा मधून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि विरोधी पक्षनेते के. टी. रामाराव बैठकीत सामील झाल्याने त्या राज्यातली परस्पर विरोधी मते बैठकीत नोंदली गेली. या सगळ्यामुळे स्टालिन अण्णांची राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याकडे निघालेली गाडी मध्येच अडकून पडली.
त्याचवेळी या बैठक स्थळापासून जवळच भाजपने अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या भ्रष्टाचाराचे फलक झळकवून मोठ्या आंदोलन केले. आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाषेच्या आड बैठका घेतल्या जात असल्याचा त्यांनी निषेध केला.
Tamil Nadu CM MK Stalin felicitates CMs of states as well as leaders from various parties
महत्वाच्या बातम्या
Array