वृत्तसंस्था
चेन्नई : Tamil Nadu तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूरजवळ रविवारी दुपारी दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 महिला, 2 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शिवगंगा एसपी शिवा प्रसाद यांच्या मते, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.Tamil Nadu
घटनेचे जे फोटो-व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात दिसत आहे की, स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस ड्रायव्हरच्या बाजूने धडकल्या. धडकेमुळे बसचा ढिगारा रस्त्यावर पसरला. लोकांचे मृतदेह सीटमध्ये अडकले होते.
लोकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर, स्थानिक लोकांनी बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App