वृत्तसंस्था
श्रीनगर – अफगाणिस्तानात तालिबानने राजवटीवर कब्जा केल्यावर भारतातल्या काँग्रेसनिष्ठ पक्षांचा सूर कसा बदलला आहे, याचे उदाहरण आज जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्लांच्या वक्तव्यातून दिसले आहे. त्यांनी तालिबानला अनुकूल सूर आळवून घेतले आहेत. (Taliban) will deliver good governance following Islamic principles in that country (Afghanistan) & respect human rights.
अफागाणिस्तानातल्या तालिबान राजवटीवर बोलताना ते म्हणाले, की अफगाणिस्तान एक वेगळा देश आहे. तालिबान त्या देशावर राज्य करू इच्छित आहे. त्यांनी राज्य व्यवस्था नुकतीच हातात घेतली आहे. माझे असे मत आहे, की तालिबानी इस्लामी कायद्याचा अवलंब करून त्यांच्या देशवासीयांशी माणूसकीचा व्यवहार करतील. अन्य देशांशी त्यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी त्यांना सूचना राहील, असा सल्ला देखील डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी तालिबानी राजवटीला दिला.
#WATCH | "I hope they (Taliban) will deliver good governance following Islamic principles in that country (Afghanistan) & respect human rights. They should try to develop friendly relations with every country," says National Conference chief Farooq Abdullah in Srinagar pic.twitter.com/b6hXNn2Bhr — ANI (@ANI) September 8, 2021
#WATCH | "I hope they (Taliban) will deliver good governance following Islamic principles in that country (Afghanistan) & respect human rights. They should try to develop friendly relations with every country," says National Conference chief Farooq Abdullah in Srinagar pic.twitter.com/b6hXNn2Bhr
— ANI (@ANI) September 8, 2021
-जावेद अख्तर यांना लिबरल्सचा पाठिंबा
दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि भारतातला संघ परिवार यांची अस्थानी तुलना करणाऱ्या बॉलिवूड गीत गीतकार संवाद लेखक जावेद अख्तर यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर सगळीकडून टीकेचा भडिमार होत असताना त्यांच्या बाजूने देशातल्या 150 लिबरल्सनी जमावडा तयार केला आहे. भारतात नागरिकांच्या स्वतंत्र मतांचा अधिकार जपला गेला पाहिजे, याबद्दल आग्रही असल्याचे नमूद करत जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तिस्ता सेटलवाड, अमिर रिझवी, आनंद पटवर्धन, अंजुम राजाबाली अशा मान्यवरांचा यात सहभाग आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App