भारत बंदच्या निमित्ताने साधून घेतला डाव; बिहारमध्ये राहुल गांधींनी केला राजकीय बनाव!!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी आणि डाव्या कामगार संघटनांनी आज भारत बंद पुकारला होता. त्याचा परिणाम संपूर्ण देशभर तर काही दिसला नाही तो फक्त काही विशिष्ट राज्यांमध्येच दिसला. भारत बंदच्या निमित्ताने बिहारमध्ये जाऊन राहुल गांधींनी राजकीय बनाव केला. ते पाटण्यातल्या रॅलीत सामील झाले तिथे त्यांनी मोठे भाषण केले. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा जुनाच मुद्दा उगाळला. बिहारमध्ये काँग्रेस कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरी जाईल?, तिथे कशा पद्धतीने मजबूत संघटन बांधेल?, याविषयी राहुल गांधी काही बोलले नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. Rahul Gandhi

राहुल गांधी म्हणाले :

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप-आरएसएससारखे बोलू लागलेत. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण नंतर कायदा तुमच्यावर मात करेल. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही कितीही मोठे असलात तरी कायदा तुम्हाला सोडणार नाही.

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक चोरी सुरु असल्याचप ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणूक चोरीला गेल्या त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. ते म्हणाले की, निवडणूक आयुक्त भाजप आणि आरएसएस नेत्यांसारखे बोलतात. त्यांना (भाजपला) कळले आहे की आम्हाला महाराष्ट्र मॉडेल समजले आहे, त्यांनी आता बिहार मॉडेल आणले आहे. गरिबांची मते हिसकावून घेण्याचा हा एक मार्ग आहे.

पण नंतर कायदा तुमच्यावर मात करेल

तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण नंतर कायदा तुमच्यावर मात करेल. कायदा तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही कितीही मोठे असलात तरी कायदा तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही तुमचे काम करत नाही आहात. राहुल म्हणाले, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुका जिंकल्या. काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका हरल्या. त्यावेळी आम्ही जास्त काही बोललो नाही.काही काळानंतर, आम्ही डेटा पाहण्यास सुरुवात केली. आम्हाला आढळले की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. म्हणजे विधानसभा निवडणुकीत 10 % अधिक मतदारांनी मतदान केले. जेव्हा आम्हाला हे मतदार कुठून आले, ते कोण आहेत हे कळले तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. ज्या जागांवर मतदारांची संख्या वाढली, तिथे भाजप जिंकला. सर्व नवीन मते भाजपला गेली.

जेव्हा आम्ही मतदार यादी आणि मतदानाचा व्हिडिओ मागितला तेव्हा निवडणूक आयोग गप्प बसला. एकही शब्द बोलला नाही. एकदा नाही, तर अनेक वेळा. त्यांना सांगितले की कायद्यानुसार आम्हाला मतदार यादी दिली पाहिजे. कायद्यानुसार व्हिडिओग्राफी आम्हाला दिली पाहिजे असे म्हटले आहे. आजपर्यंत महाराष्ट्राची मतदार यादी आम्हाला देण्यात आलेली नाही. व्हिडिओ देण्याचा कायदा बदलण्यात आला आहे.

काँग्रेसने मतदार यादी मागणारे पत्र

महाराष्ट्र निवडणुकीत अनियमिततेच्या आरोपांबाबत काँग्रेसने 25 जून रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. पक्षाने आयोगाला आठवडाभरात महाराष्ट्र निवडणुकीची डिजिटल मतदार यादी मागितली होती. महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदानाचे व्हिडिओही मागितले होते. काँग्रेसने म्हटले होते की ही जुनी मागणी आहे आणि निवडणूक आयोग ती सहज देऊ शकते. डेटा मिळाल्यावर आम्ही विश्लेषण करू आणि निवडणूक आयोगाशी चर्चा करू. यापूर्वी 12 जून रोजी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना पत्र लिहून निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांवर चर्चेसाठी बोलावले होते. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने आयोगाला पत्र लिहिले होते.

राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने लिहिले होते की देशातील निवडणुका संसदेने पारित केलेल्या निवडणूक कायद्यानुसार, त्याचे नियम आणि निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अतिशय काटेकोरपणे पार पाडल्या जातात. महाराष्ट्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा मतदारसंघ पातळीवर केंद्रीकृत आहे.

Taking advantage of the Bharat Bandh, Rahul Gandhi made a political move in Bihar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात