विशेष प्रतिनिधी
कोलकता -भाजपची मंडळी मत विकत घेत आहेत. ‘कमळा’कडून पैसे घ्या, पण दोन फुलांना (‘तृणमूल’चे पक्ष चिन्ह) मत द्या. ते तुमची फसवणूक करीत असतील तर तुम्हीही तसेच का वागू नये, ’’ असा सवाल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. Take money from BJP, vote for Trinamool
भाजप पैशाच्या बदल्यात मत मागत असताना तुम्ही घासाघीस करायला हवी. ते ५०० रुपये देत असतील तर तुम्ही पाच हजार मागा, असेही ते मतदारांना उद्देशून म्हणाले.
कूचबिहारमधील तुफानगंज येथील अन्य एका सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, बाहेरील नेते हवे की त्यांची मुलगी ममता बॅनर्जी हव्यात हे जनतेने ठरवायला हवे.
भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत जनतेच्या किमान अपेक्षा पूर्ण करण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात गरजेच्या वस्तू, पेट्रोल, गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्याने नागरिकांचे जिणे अशक्य झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App