कर्तृत्वशालिनी..! सुषमा स्वराज #International_Women’s_Day_Special

सुषमा स्वराज : भाजपच्या फायर ब्रँड नेत्या. अटलजी अडवाणींपासून त्या भाजपमध्ये सक्रिय होत्या. इंदिराजींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध त्या विद्यार्थिनी नेत्या म्हणून सत्याग्रहात सामील झाल्या होत्या. 1977 मध्ये काँग्रेसचा पाडाव करून हरियाणात जनता पक्षाची राजवट आल्यानंतर त्या मंत्री बनल्या. हरियाणात सर्वात तरुणपणी मंत्री बनलेल्या त्या पहिल्या नेत्या ठरल्या. swaraj swaraj international womens day speacial

यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बहरतच राहिली. लोकसभेत त्यांची अनेक भाषणे गाजली. 1999 मध्ये सोनिया गांधींनी जेव्हा संसदीय राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघात निवडणूक लढविण्याची हिंमत सुषमा स्वराज यांनी दाखवली होती. त्यावेळी त्यांना अपयश आले. पण या अपयशातून त्या खचल्या नाहीत. उलट मोठ्या त्वेषाने त्या राजकारणात उभ्या राहिल्या. अटलजींच्या मंत्रिमंडळात मंत्री बनल्या.

त्यानंतरही भाजपमध्ये सक्रिय राहून सुषमाजींनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून उज्वल कामगिरी बजावली. संयुक्त राष्ट्रसंघ, शांघाय कॉर्पोरेशन समिट, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक नेशन्स आदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमाजींचे भाषण अत्यंत गाजले. मोदी सरकारच्या ऍक्ट ईस्ट परराष्ट्र धोरणाच्या त्या पुरोधा होत्या.

सुषमाजी सर्वसामान्यांच्या परराष्ट्र मंत्री होत्या. अनेकांना व्हिसापासून ते भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात वैद्यकीय उपचारापर्यंत त्यांनी मदत केली. भारताचे गुंतागुंतीचे आक्रमक परराष्ट्र धोरण सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचे श्रेय सुषमाजींना जाते.

swaraj swaraj international womens day speacial

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात