स्वदेशलक्ष्मी पूजन; संरक्षण बजेटमधील 65% रक्कम भारतीय संरक्षण सामग्री खरेदीवर खर्च

वृत्तसंस्था

नौशेरा : देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पातील एकूण 65% रक्कम देशांतर्गत संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी खर्च होत आहे. कारण देशात आता अत्याधुनिक अर्जुन सारखे रणगाडे आणि तेजस सारखी अत्याधुनिक विमाने यांचेही उत्पादन होत आहे. संरक्षण सामग्री जास्तीत जास्त भारतीय वापरण्याचा केंद्र सरकारचा पक्का इरादा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर मधल्या नौशेरा येथे केले. Swadeshalakshmi Pujan; 65% of the defense budget is spent on purchasing Indian defense equipment

मोदी सध्या जवानांसमवेत दिवाळीचा सण साजरा करीत आहेत. त्यांनी जवानांना आपल्या हाताने मिठाई भरवून आपण येथे पंतप्रधान या नात्याने नव्हे, तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य या नात्याने आलो आहोत, असे सांगितले. नौशेराच्या युद्ध स्मारकावर जाऊन मोदींनी पुष्पचक्र अर्पण केले.

यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेत संरक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. देशात संरक्षण सामग्री जास्तीत जास्त तयार व्हावी. तिची निर्यात देखील व्हावी यावर सरकारचा भर आहे. देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पाच्या एकूण 65% रक्कम देशांतर्गत संरक्षण सामग्री खरेदी करण्यावर खर्च होत आहे. याचा अर्थ आता भारत परकीय संरक्षण सामग्रीवर कमीत कमी अवलंबून आहे. देशात संरक्षण सामग्रीचे उत्पादन आणि संशोधन यावर गेल्या सात वर्षात मोठ्या प्रमाणावर भर देऊन संरक्षण सामग्री आयातीवरचा खर्च कमी करण्यात आला आहे.

या विजयादशमीला देशातील 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीसे रूपांतर सात संरक्षण सामग्री उत्पादन कंपन्यांमध्ये करण्यात आले आहे. त्यांच्याकडे भारतीय सैन्यदलाच्या सामग्री उत्पादनाच्या 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.

आज लक्ष्मीपूजन आहे. यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1925 मध्ये लिहिलेली “स्वदेशलक्ष्मी पूजन” ही कविता मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीच्या काळात फक्त स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर सावरकर यांचा आग्रह होता. तो त्यांनी त्यावेळी कवितेतून मांडला आहे. त्याच वेळी आपल्या खरेदीतून परकीयांचे खिसे भरू नका, असा महत्वपूर्ण संदेशही या कवितेतून त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे मूळ याच स्वदेशी धोरणात आहे आणि देशाचे संरक्षण क्षेत्र या स्वदेशी धोरणाच्या दिशेने निघाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनातून स्पष्ट होताना दिसत आहे.

Swadeshalakshmi Pujan; 65% of the defense budget is spent on purchasing Indian defense equipment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात