अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक

स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे. Swabhimani’s Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha


विशेष प्रतिनिधी

नागपूर : स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कस्टडी मध्ये रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. .दंगलशाही खपून घेणार नाही सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.



नागपूरमध्ये सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत होती. पोलिसांच्या मार्फत रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याच्या सरकारने टाकलेला डाव आम्ही उधळून लावू..रविकांत तुपकर व स्वाभिमानीचे कार्यकर्ते लढाऊ आहे…ते अशा पोलीस कारवाईला घाबरत नाही.मात्र याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील व आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

Swabhimani’s Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात