12 खासदारांचे निलंबन; विरोधकांची निदर्शने, पण त्यातही तृणमूळ काँग्रेसचा मार्ग वेगळा…!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांचे निलंबन केले आहे. त्यावरून देशात गदारोळ उठला असताना सर्व विरोधकांनी एकत्र येत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी एकत्र येत निदर्शने केली आहेत. या निदर्शनांमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूळ काँग्रेसचे खासदार सामील झाले होते हे खरे. पण त्यातही त्यांनी आपला वेगळा गट आणि मार्ग दाखवून दिला…!!Suspension of 12 MPs; Protests by protesters

काँग्रेसच्या खासदारांनी गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. थोड्या वेळाने तृणमूळ कॉंग्रेसचा गट तिथे पोहोचला. त्यावेळी खासदारांनी आम्ही सर्व विरोधकांसमवेत आहोत पण आम्ही वेगळ्या गटाने सभापतींची भेट घेणार आहोत, असेही स्पष्ट केले.

निदर्शने संपल्यानंतर तृणमूळ काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तृणमूळ काँग्रेसची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. तृणमूळ काँग्रेस स्वतंत्रपणे निदर्शने करणार आहे. उद्यापासून तृणमूळ काँग्रेसचे दोन खासदार सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करणार आहेत. या निदर्शनांच्या वेळी आम्ही सर्व खासदारांना आमच्या बरोबर येण्याची विनंती करणार आहोत, असे डेरेक ओब्रायन यांनी स्पष्ट केले.

याचा अर्थच तृणमूळ काँग्रेस स्वतंत्रपणे वाटचाल करत असताना सर्व विरोधकांना एकत्र करण्याचीही भूमिका संसदेत घेताना दिसत आहे. आज सायंकाळी ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल होत आहेत. त्या रात्री आठ वाजता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. उद्या त्यांचा शरद पवारांची भेट घेण्याचा कार्यक्रम आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूळ काँग्रेसची “एकला (संग) चलो रे” ही भूमिका अधोरेखित होत आहे

Suspension of 12 MPs; Protests by protesters

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात