विशेष प्रतिनिधी
पुणे : IAS Pooja Khedkar भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर (४८) यांच्याविरुद्ध एका चालकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.IAS Pooja Khedkar
याबाबत नवी मुंबईतील रबाळे ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली. नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक ट्रक कारला शेजारून घासून गेल्याने वाद निर्माण झाला. कार चालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक १४ सप्टेंबर खेडकर यांच्या बंगल्यात पाेहोचले. त्या वेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात आले.IAS Pooja Khedkar
पोलिसांनी केली पुण्यातून अपहृत ट्रकचालकाची सुटका
या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत खेडकर यांनी ट्रक चालकाचे अपहरण करणारा कार चालक आरोपी याला पसार होण्यास मदत केली. आरोपी कार घेऊन पसार झाला. पोलिसांनी चौकशीत सहकार्य केले नाही, तसेच बंगल्यात त्यांनी पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला, असे खरात यांनी सांगितले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी अपहृत झालेल्या ट्रक चालकाची सुटका केली. या वेळी खेडकर यंानी पोलिसांशी वाद घातल्याचे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App