सुषमा स्वराज यांच्या कन्येचा राजकारणात प्रवेश, जाणून घ्या बांसुरी स्वराज यांच्याबद्दल

प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांना दिल्ली भाजप सेलमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्याही उशिरा का होईना राजकारणात उतरतील अशी अपेक्षा होती. त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी येथे सांगत आहोत.Sushma Swaraj’s daughter’s entry into politics, know about Bansuri Swaraj

बांसुरी स्वराज या कायदेशीर प्रक्रियेचा अनुभव असलेल्या वकील आहेत. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी आणि लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे.



त्यांनी कायद्यात बॅरिस्टर म्हणूनही पात्रता मिळवली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण केले आहे.

आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत बांसुरी स्वराज यांनी विविध न्यायिक मंचांवर वादग्रस्त खटल्यांमध्ये हाय-प्रोफाइल प्रकरणांचे प्रतिनिधित्व केले आहे.

बांसुरी यांनी करार, रिअल इस्टेट, कर, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद तसेच अनेक फौजदारी खटल्यांशी संबंधित विवाद हाताळले आहेत.

बांसुरी स्वराज यांची खासगी प्रॅक्टिस सुरू ठेवत हरियाणा राज्यासाठी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी रविवारी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. दिल्ली भाजपच्या लीगल सेलचे सह-संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांसुरी स्वराज यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची पक्षाच्या पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. पक्षाची सेवा करण्याची ही संधी असून ही जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाची आभारी आहे, असेही त्या म्हणाल्या.

Sushma Swaraj’s daughter’s entry into politics, know about Bansuri Swaraj

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात