मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली. Surgana: 11th Science student commits suicide as she does not have mobile for online education
विशेष प्रतिनिधी
सुरगाणा : सुरगाणा येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली आहे. भारती तुकाराम चौधरी ( वय १७ रा.हातरूडी) अस तिचे नाव आहे. कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती.
मात्र कालपासून पहिले ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार होते. दरम्यान भारतीचे काका हिरामण चौधरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अन्ड्राईड मोबाईल नाही.
पुरेसे नेटवर्क पण उपलब्ध नाही तसेच मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली.भारतीच्या पश्चात तिची आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App