कार्यकर्त्यांच्या पिढ्यान पिढ्या खपल्या, त्या केरळमध्ये भाजपला पहिला विजय मिळाला; मते 20 %; सुरेश गोपी पहिले खासदार!!

Suresh Gopi first bjp MP in kerala

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पिढ्यान पिढ्या ज्या राज्यात खपल्या, त्या केरळमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत पहिला विजय मिळाला राज्यामध्ये भाजपला 20% मते तर मिळालीच पण त्याचबरोबर सुरेश गोपी यांच्या रूपाने पहिला खासदार लोकसभेत पोहोचला. Suresh Gopi first bjp MP in kerala

त्रिशूल लोकसभा मतदारसंघात सुरेश गोपी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 74 हजार मतांनी पराभव केला. सुरेश गोपी यांना 4 लाख 12 हजार 338 मते मिळाली त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या के व्ही एस सुनील कुमार यांना 4 लाख 37 हजार 352 मते मिळाली तर काँग्रेसचे के मुरलीधरन यांना 3 लाख 28 हजार 124 मते मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

ज्या केरळमध्ये भाजप उमेदवारांची डिपॉझिट जप्त होत होती, त्याच राज्यात भाजपला आता लोकसभा निवडणुकीत एकूण 20 मतदारसंघ मिळून तब्बल 20 % मते मिळाली. पक्षाची ही फार मोठी कामगिरी आहे. भविष्यकाळात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतांची टक्केवारी अधिक वाढवू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी दिली.

भाजपच्या मुख्यालयामध्ये काल झालेल्या अभिनंदन समारंभात पंतप्रधान मोदींनी केरळ मधल्या या विजयाचा आवर्जून उल्लेख केला भाजपचे कार्यकर्ते पिढ्यानपिढ्या ज्या राज्यात खपले त्या केरळमध्ये विजयी यात्रेची सुरुवात झाली अशी ग्वाही मोदींनी दिली.

Suresh Gopi first bjp MP in kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub