वृत्तसंस्था
सुरत : Surat Textile गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील जोलवा गावातील संतोष टेक्सटाईल मिलमध्ये सोमवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मिलमध्ये अचानक रसायनांनी भरलेला ड्रम फुटला, ज्यामुळे मिलमध्ये आग लागली. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.Surat Textile
पलसाणा तालुक्यातील जोलवा गावातील संतोष मिलमध्ये ड्रमचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे जिल्हा अधिकारी व्ही. के. पिपलिया यांनी सांगितले. या आगीत २० जण जखमी झाले आहेत, ज्यांना बारडोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरत महानगरपालिका आणि बारडोली अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत.Surat Textile
काही कामगार आत अडकले होते.
कामगारांनी सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की आग संपूर्ण मिलमध्ये वेगाने पसरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे मिलमध्ये घबराट पसरली. कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली, परंतु काही कामगार आत अडकले.
तपासादरम्यान, बचाव पथकाने मिलच्या आतून दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही कामगार अजूनही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App