सुरतेत GST घोटाळा, 8वी पास मास्टरमाइंडने 1500 डमी कंपन्या तयार केल्या, 2700 कोटींचा GST चोरी

प्रतिनिधी

सुरत : 1500 डमी कंपन्या तयार करून 2700 कोटींचा जीएसटी घोटाळा करणाऱ्या मास्टरमाइंडला गुजरातमधील सुरतमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपींनी केमिकल आणि रद्दी व्यवसायाच्या नावाखाली बनावट बिलिंग केले. या मास्टरमाइंडने एकट्याने 901 कोटींचा जीएसटी घोटाळा केला. या संपूर्ण रॅकेटमध्ये 35 लोक सामील आहेत. यातील 19 जण पकडले गेले आहेत, तर 16 अजूनही फरार आहेत.Surat GST scam, 8th pass mastermind created 1500 dummy companies, 2700 crore GST evasion

जीएसटी घोटाळ्याचा सूत्रधार सुफियान कपाडिया याला सुरत पोलिसांच्या इकॉनॉमिक सेलने गुरुवारी अटक केली. सुफियाननेच जीएसटी चोरीला सुरुवात केली होती. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी कंपन्या तयार करून बनावट बिलिंग करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला.


  1. राज्य सरकारची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ULC घोटाळ्याच्या आरोपीला बेड्या, ठाणे पोलिसांची सुरतेत कामगिरी

जीएसटी घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा वापर कसा झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांना विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे एबी एंटरप्राइज, बारिया एंटरप्राइज, गणेश एंटरप्राइज, जय अंबे एंटरप्राइज अशा अनेक डमी कंपन्या उघडण्यात आल्या आहेत. जीएसटी परवाना घेऊन त्या फर्मच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आहे. बँक खाते वापरून बेकायदेशीरपणे व्यवसाय करून इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यात आले.

15 राज्यांमध्ये 250 हून अधिक बनावट कंपन्या नोंदणीकृत

एसीपी वीरजीत सिंग यांनी सांगितले की, आरोपींनी गुजरातबाहेरील 15 वेगवेगळ्या राज्यांमध्ये 250 हून अधिक कंपन्या नोंदणीकृत केल्या आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या उस्मानला सर्वप्रथम भावनगर येथून अटक करण्यात आली. तो भावनगर आणि सुरत येथून जीएसटी चोरी करणारी टोळी चालवत असे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड सुफियान कपाडिया हा फरार होता, त्याला इकॉनॉमिक सेलने सुरतमधून अटक केली आहे. सुफियानने सुरतमध्ये 8 बनावट कंपन्या तयार केल्या होत्या.

Surat GST scam, 8th pass mastermind created 1500 dummy companies, 2700 crore GST evasion

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात