मोदी आडनावाला चोर ठरविणारे राहुल गांधी दोषी, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; सुरत कोर्टाचा निकाल!!; कोर्टाच्या खटल्यात आजीनंतर नातू दोषी!!

वृत्तसंस्था

सुरत : मोदी आडनावाला चोर ठरवून त्यावर बदनामीकारक टिपण्णी करणाऱ्या खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या देशात सगळेच चोर मोदी कसे??, असा सवाल राहुल गांधींनी कर्नाटकातल्या एका जाहीर सभेत केला होता. नीरव मोदी आणि ललित मोदी हे चोर घोटाळे करून भारताबाहेर पळून गेले. आणखी एक मोदी देशात घोटाळे करायला चिथावणी देत आहेत, सगळेच चोर मोदी कसे??, अशी बदनामीकारक टिपण्णी राहुल गांधींनी कर्नाटकात केली होती. Surat District Court sentenced Congress MP Rahul Gandhi to two years of imprisonment in the criminal defamation case filed against him over his alleged ‘Modi surname’ remark.

या मुद्द्यावरून त्यांच्याविरुद्ध मोदी आडनावाला चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टात केस दाखल झाली. राहुल गांधींच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना ही कोणावर वैयक्तिक टिप्पणी नव्हती, असा दावा केला परंतु कोर्टाने हा दावा फेटाळत राहुल गांधींना मानहानीच्या दाव्यात दोषी ठरविले आहे.

खटल्याचे विशेष महत्त्व

राहुल गांधींनी मोदी आडनावाला चोर ठरवण्याचा खटल्याचे एक विशेष महत्त्व आहे. ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जात, आडनाव, लिंग, धर्म यावरून बदनाम करणे कायद्याने गुन्हा आहे.

आजी नंतर नातू दोषी

त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासारख्या गांधी परिवारातल्या नेत्याला कोर्टाने एखाद्या प्रकरणात दोषी ठरविले गेल्याची ठरविल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. याआधी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन निवडून आल्याबद्दल अलाहाबाद कोर्टाने कायद्याच्या कसोटीवर दोषी ठरविले होते. त्यांची लोकसभेच्या खासदारकीची निवडणूक रद्द ठरवली होती. पण त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडवून त्या खटल्याच्या निकालाची परिणिती संपूर्ण देशावर आणीबाणी लादण्यात झाली होती. त्यानंतर 23 मार्च 2023 रोजी राहुल गांधींना मोदी आडनावाला चोर ठरवून बदनामी केल्याबद्दल कोर्टाने दोषी ठरविले आहे. कोर्टाच्या कायदेशीर खटल्यात आजी नंतर नातू दोषी ठरला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलिकडचे जाऊन हे प्रकरण कोर्टाने कायदेशीररित्या हाताळून राहुल गांधींना दोषी ठरविले आहे. हे या खटल्याचे कायदेशीर आणि राजकीय महत्त्व आहे.

Surat District Court sentenced Congress MP Rahul Gandhi to two years of imprisonment in the criminal defamation case filed against him over his alleged ‘Modi surname’ remark.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात