वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Stray Dog Attacks सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर कठोर टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले, ‘भटक्या कुत्र्यांच्या कोणत्याही हल्ल्यात दुखापत किंवा मृत्यू झाल्यास, नगरपालिकेसोबतच डॉग फीडर्सची जबाबदारीही निश्चित केली जाऊ शकते.’Stray Dog Attacks
न्यायालयाने म्हटले – मागील सुनावणीतील टिप्पण्यांना विनोद समजणे चुकीचे ठरेल. आम्ही गंभीर आहोत. न्यायालय जबाबदारी निश्चित करण्यापासून मागे हटणार नाही, कारण सध्याच्या व्यवस्थेत स्थानिक प्रशासनाचे अपयश समोर आले आहे.Stray Dog Attacks
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले – न्यायालय खासगी पक्षांचे युक्तिवाद पूर्ण करून आजच सुनावणी संपवू इच्छिते. यानंतर राज्यांना एक दिवसाची संधी दिली जाईल.Stray Dog Attacks
आजच्या सुनावणीत- पीडितांच्या वतीने अधिवक्ता हर्ष जैदका, डॉग लव्हर्स/एनजीओच्या वतीने अधिवक्ता प्रशांत भूषण, मेनका गांधींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता राजू रामचंद्रन यांनी युक्तिवाद केला.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कठोर टिप्पणी केली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची प्रत्येक घटना आणि त्यामुळे होणारा प्रत्येक मृत्यू रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, तर त्यांच्यावर मोठा मोबदला किंवा दंड आकारला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केवळ सरकारच नाही, तर जे लोक (डॉग फीडर्स) सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतात त्यांनाही जबाबदार धरले जाऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर कठोर टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले, ‘मुले किंवा वृद्धांना कुत्र्यांनी चावल्याने, जखमी झाल्याने किंवा मृत्यू झाल्याच्या प्रत्येक प्रकरणात आम्ही राज्य सरकारांकडून मोठे नुकसान भरपाई मिळवून देऊ, कारण त्यांनी गेल्या 5 वर्षांत नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काहीही केले नाही.’
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अडीच तास भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी केली. न्यायालयाने कुत्र्यांच्या वर्तनावर चर्चा केली. न्यायमूर्ती नाथ यांनी सांगितले की कुत्रे मानवी भीती ओळखतात म्हणून ते चावतात. (श्वानांची बाजू मांडणाऱ्या) एका वकिलाने हे नाकारले. न्यायमूर्तींनी उत्तर दिले, “डोके हलवू नका, मी वैयक्तिक अनुभवावरून बोलत आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App