वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Supreme Court शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणारे शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत पंजाब सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने पंजाब सरकारच्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त केली.Supreme Court
न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आणि म्हटले की, जर उर्वरित शेतकरी नेते डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवण्यास विरोध करत असतील आणि राज्य सरकार स्वत:ला असहाय दाखवत असेल तर ते आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे आहे. त्याच वेळी राज्य सरकारने सांगितले की डल्लेवाल यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. खंडपीठाने २० डिसेंबरच्या आदेशांचे पालन करण्यासाठी पंजाब सरकारला अतिरिक्त वेळ देत सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.
कोर्टात काय घडलं….
पंजाब सरकारने म्हटले- डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवल्यास जीवित व वित्तहानी होऊ शकते. यावर न्यायमूर्ती म्हणाले, ही परिस्थिती कोणी होऊ दिली?
पंजाब सरकारने म्हटले- शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळाला घेराव घातला आहे. एक जीव वाचवण्यासाठी आपण चार जीव गमावू शकत नाही.
कोर्टाने म्हटले की, तुमच्या योग्य हेतूने केलेल्या कोणत्याही कृतीला विरोध असेल तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. केंद्र सरकारकडून काही मदत हवी आहे असे वाटत असेल तर सूचना देऊ. डल्लेवाल यांना सांगा की ते बरे झाल्यानंतर उपोषण सुरू ठेवू शकतात.
पंजाबने खुलासा केला की, शेतकऱ्यांचे पत्र आम्ही ठेवले आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यास हा प्रकार शांत होऊ शकतो.
यावर कोर्टाने म्हटले की, यात कोणतीही पूर्वअट राहणार नाही. डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्या मागण्यांवर विचार करू.
डल्लेवाल सुनावणीनंतर म्हणाले, कोर्ट म्हणते, आम्ही केंद्राला हस्तक्षेपाचा आदेश देऊ शकत नाहीत. त्यातून असे वाटते की, ते भारत सरकारच्या बाजूने बोलत आहेत. कदाचित कोर्टालाही वाटत असेल शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या जाव्यात.
खंडपीठ म्हणाले, एखाद्याला रुग्णालयात नेण्यापासून रोखण्यासाठी शेतकरी एकत्र येणे यापूर्वी ऐकले नाही. आम्ही त्यांच्या वर्तनावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु जे डल्लेवाल यांना रोखत आहेत ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सामील आहेत. ते त्यांचे शुभचिंतक नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App