मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्च पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआय कोर्टाने दिल्यानंतर त्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने आता त्यांनाच फटकार लगावली असून सीबीआय कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याची मूभा असताना तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात कसे काय आलात?, अशी विचारणा करून सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यायलाही नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांना हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.Supreme Court reprimands Manish Sisodia; How did you come directly to the Supreme Court instead of going to the High Court??



दिल्लीतील दारू घोटाळ्या संदर्भात भरपूर चौकशी आणि तपास केल्यानंतर सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केली. सरकारच्या मूळच्या दारू धोरणात नसलेले बरेच मुद्दे परस्पर सिसोदिया यांनी त्यामध्ये घुसडून दारू उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या होत्या. या सवलतीच्या बदल्यात त्यांच्या आम आदमी पार्टीने बरीच माया जमवल्याचा आरोप झाला होता. सीबीआयच्या तपासात या गोष्टींचे धागेदोरे हाती आले आहेत.

या पार्श्वभूमीवर सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली आणि कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 4 मार्चपर्यंत कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. होते. त्या विरोधात मनीष सिसोदिया यांना हायकोर्टात जाण्याची मूभा असताना आपल्या वकिलांच्या सल्ल्याने मनीष सिसोदिया थेट सुप्रीम कोर्टात गेले. नेमक्या याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकार लावली. सीबीआय कोर्टाचा निकाल मान्य नसेल, तर तुम्हाला हायकोर्टात जाण्याची कायदेशीर मूभा होती. तिथे जायचे सोडून तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात?, अशी विचारणा करून सिसोदिया यांचा संबंधित अर्ज देखील सुनावणीस घ्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि त्यांना हायकोर्टात दाद मागण्याची निर्देश दिले.

Supreme Court reprimands Manish Sisodia; How did you come directly to the Supreme Court instead of going to the High Court??

महत्वाच्या बातम्या 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात