वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची वळणे आणि वळसे अंबिका सोनींपासून सुरु होऊन चरणजीत सिंग चन्नी यांच्यापर्यंत येऊन थांबली आहेत. Supporters of new Punjab CM-designate Charanjit Singh Channi celebrate outside Governor’s house in Chandigarh
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरोधात बंडाचा झेंडा बंद करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचा वळसा घालून काँग्रेस श्रेष्ठींनी दलित नेते चरणजीत सिंग यांनी यांची निवड केली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे नवज्योत सिंग सिद्धू यांच्यापेक्षा वयाने मोठे होते रणजीत सिंग यांनी हे त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत याचा राजकीय अर्थ खूप मोठा असू शकतो
शिवाय या वळशा आणि वळणांमध्ये सुनील जाखड, सुखविंदर सिंग रंधवा यांची नावेदेखील माध्यमांनी जोरदार चालवून घेतली होती. परंतु भाजपने जसा माध्यमांना गुजरातमध्ये भूपेंद्र यादव यांची निवड करून चकवा दिला तसाच चकवा काँग्रेस श्रेष्ठींनी चरणजीत सिंचन यांची निवड करून माध्यमांना दिला आहे. माध्यमांनी जी नावे चालवली होती त्यामध्ये चरणजीत सिंग यांनी यांचे नाव नव्हते.
Supporters of new Punjab CM-designate Charanjit Singh Channi celebrate outside Governor's house in Chandigarh pic.twitter.com/KLVUWpellP — ANI (@ANI) September 19, 2021
Supporters of new Punjab CM-designate Charanjit Singh Channi celebrate outside Governor's house in Chandigarh pic.twitter.com/KLVUWpellP
— ANI (@ANI) September 19, 2021
अर्थात काँग्रेस श्रेष्ठींचा हा “फर्स्ट चॉइस” नाही. काँग्रेस श्रेष्ठींच्या मते अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारायला हवे होते. परंतु पंजाबमध्ये शीख व्यक्तीच मुख्यमंत्रीपदी हवी अशी आग्रही भूमिका अंबिका सोनी यांनी मांडून आपल्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची औटघटकेची माळ बांधून घेतली नाही. त्यानंतर सुनील जाखड आणि सुखजिंदर सिंग रंधवा यांची नावे दुपारभर चालली होती.
त्यातही सुखजिंदर सिंग रंधवा यांचे नाव जवळजवळ जाहीर झाले असेच माध्यमांनी प्रसिद्ध केले परंतु स्वतः सुखजिंदर सिंग रंधवा यांनी उतावळेपणा न करत दोन-तीन तास थांबा. अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असे स्पष्टपणे माध्यमांना बजावले होते. काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत ते मुरलेले नेते असल्यामुळे त्यांना आपली मुख्यमंत्री पदी निवड होणार नाही याची खात्री असावी. त्यामुळेच त्यांनी उतावळेपणा न करता आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही असे माध्यमांना दुपारीच सांगितले होते.परंतु तरीही माध्यमांनी त्यांचे नाव दुपारनंतर जोरदार चालविले होते.
अखेरीस 48 वर्षांचे दलित नेते चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करून काँग्रेस श्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांना नव्हे तर माध्यमांना धक्का देऊन घेतला आहे.
Supporters of new Punjab CM-designate Charanjit Singh Channi celebrate outside Governor’s house in Chandigarh
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App