पंतप्रधान मोदींनी ‘देशाच्या लेकीला लिहिले पत्र
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sunita Williams आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जवळजवळ नऊ महिने घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. स्पेसएक्सचे कॅप्सूल क्रू-९ सुनीता आणि विल्मोर यांना आयएसएसमध्ये घेऊन निघाले आहे. तर पृथ्वीवर परतल्यानंतर, सुनीता विल्यम्स लवकरच भारतात येऊ शकतात. पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहून भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.Sunita Williams
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र शेअर केले. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात.”
पंतप्रधान मोदींनी हे पत्र १ मार्च रोजी सुनीता विल्यम्स यांना लिहिले होते. यामध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘मी तुम्हाला भारताच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा पाठवत आहे. आज मी एका कार्यक्रमात प्रसिद्ध अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांना भेटलो. संभाषणादरम्यान तुमचे नाव पुढे आले आणि आम्ही तुमचा आणि तुमच्या कामाचा आम्हाला किती अभिमान आहे यावर चर्चा केली. या चर्चेनंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.
त्यांनी लिहिले, ‘जेव्हा जेव्हा मी अमेरिका भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटायचो, तेव्हा मी नेहमीच तुमच्याबद्दल विचारायचो. १४० कोटी भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान आहे. अलीकडील घटनांमुळे तुमचा प्रेरणादायी दृढनिश्चय समोर आला आहे. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत.”
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, तुमची आई बोनी पंड्या तुमच्या सुरक्षित परतीची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की दिवंगत दीपक भाईंचे आशीर्वादही तुमच्यासोबत आहेत. मला आठवतंय मी २०१६ मध्ये अमेरिकेला गेलो होतो तेव्हा मी त्यांना तुमच्यासोबत भेटलो होतो. तुम्ही अंतराळातून परतल्यानंतर आम्हाला भारतात भेटण्याची उत्सुकता आहे. देशाच्या महान कन्येचे आतिथ्य करणे भारतासाठी आनंदाची गोष्ट असेल. या पत्रात पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांचे पती मायकेल विल्यम्स यांचेही अभिनंदन केले आहे. तुम्हाला आणि बुच विल्मोरला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App