वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी : Sukh Chahal कॅलिफोर्नियामध्ये राहणारे आणि खलिस्तानी विचारसरणीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन व्यावसायिक सुखी चहल यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे.Sukh Chahal
त्यांच्या जवळचे मित्र जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, ३१ जुलै रोजी सुखीला एका ओळखीच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेवणानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.Sukh Chahal
जसपाल म्हणाले की, सुखी पूर्णपणे निरोगी होते आणि त्यांच्या अचानक मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुखी हे खलिस्तानी घटकांचे कट्टर टीकाकार होते आणि १७ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या खलिस्तान जनमत चाचणीला ते उघडपणे विरोध करणार होते.
खलिस्तानी समर्थक धमक्या देत होते
‘द खालसा टुडे’चे संस्थापक आणि सीईओ सुखी यांना खलिस्तानी समर्थकांकडून सतत धमक्या येत होत्या. तरीही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या निधनाने भारत समर्थक समुदायात शोककळा पसरली आहे, असे त्यांचे परिचित बुटा सिंग कालेर यांनी सांगितले.
पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सत्य समोर येईल. सुखी भारतीय स्थलांतरितांना अमेरिकेचे कायदे पाळण्याचा आणि गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा सल्ला देत असे.
अलिकडेच त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, ‘अमेरिकेत कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गुन्हा केला तर तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो आणि परतणे कठीण होऊ शकते.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App