सीबीआय आणि दिल्ली उपराज्यपालांकडे केली तक्रार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुमारे 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक मोठा लेटर बॉम्ब फोडला आहे. सीबीआय आणि दिल्ली उपराज्यपालांना दिलेल्या तक्रारीत सुकेश चंद्रशेखरने सतेंद्र जैन, अरविंद केजरीवाल आणि तिहारचे माजी डीजी संदीप गोयल यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा दावा केला आहे. Sukesh Chandrasekhar explodes letter bomb saying that Satyendar Jain and Arvind Kejriwal have been bribed with lakhs
सुकेश चंद्रशेखरने सीबीआयला एक पत्र दिले आहे, ज्यामध्ये सतेंद्र जैन, अरविंद केजरीवाल आणि तिहारचे माजी डीजी संदीप गोयल यांच्याविरोधात तक्रार आहे. यामध्ये सतेंद्र जैनच्या मास्टर ठग सुकेशसोबत झालेल्या चॅटचे तीन स्क्रीन शॉट्स समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने एलजीकडे आणखी एक तक्रार दिली असून त्यात त्याने चौकशीची मागणी केली आहे.
फसवणुकीच्या प्रकरणात मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की, आता केजरीवालांचा खेळ संपला आहे, ते लवकरच तिहारमध्ये येतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App