गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिकाची न्यायायासाठी आत्महत्या, मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच मतदारसंघातील नागरिकाचा न्याय मिळविण्याच्या लढाईत बळीगेला. 20 ऑगस्टला मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.Suicide for justice of a citizen in the constituency of Home Minister, death of a farmer who was poisoned in front of the Ministry

त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र पाठवून त्यांनी आपली कैैफियत मांडली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.मुंबईतील जिटी रुग्णलायात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांचे पुत्र गणेश जाधव यांनी दिली.



सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता.

सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले.

तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना समोर आली होती.

Suicide for justice of a citizen in the constituency of Home Minister, death of a farmer who was poisoned in front of the Ministry

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात