विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए आघाडीने चांगलीच तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या रात्रीपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल परंतु याआधी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे टेन्शन वाढले आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी मताची जुळवाजुळव करण्यासाठी बी सुदर्शन रेड्डी यांनी इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची गाठभेट घेतली होती. या दरम्यान त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांची देखील भेट घेतली होती. सुदर्शन रेड्डी यांच्या लालूप्रसाद यादव यांच्या सोबत भेटीचा फोटो वायरल झाला होता. आता याच भेटीमुळे सुदर्शन रेड्डी च्या अडचणीत वाढ झाली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या भेटीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये तुरुंग वारी करावी लागली आहे. चारा घोटाळ्यात 940 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. अशा भ्रष्टाचारी व्यक्तीला भेटायला गेल्यामुळे माजी न्यायमूर्ती असणाऱ्या सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजप कडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
सुदर्शन रेड्डी यांनी काल वर्तमानपत्रांमध्ये ‘Vote for me to save the soul of nation ‘ अशी जाहिरात दिली होती. त्यांच्या या जाहिरातीवरून भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी टीका करतान म्हटले की , ” एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तीला घरी जाऊ सुदर्शन रेड्डी भेटत आहेत आणि एका दुसऱ्या बाजूला संविधानाचा आत्मा वाचवण्यासाठी मला मतदान करा असे आवाहन करत आहेत. हे त्यांचे ढोंग आहे. निवृत्त न्यायमूर्ती असणाऱ्या व्यक्तीने असे वागणे चुकीचे आहे. ही हिपोक्रेसी आहे. ”
सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील अनिल सोनी यांनी देखील बी सुदर्शन रेड्डी यांच्या लालूप्रसाद यादव यांच्या सोबतच्या भेटीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले , ” संपूर्ण न्यायिक समाज हे पाहून स्तब्ध आहे की संविधानिक पदावर असणारा एक व्यक्ती जो माझी न्यायमूर्ती राहिलेला आहे तो एका भ्रष्टाचारी व्यक्तीच्या भेटीला गेला. 940 करोड रुपयांचा घोटाळा केलेल्या व्यक्तीला आपल्या राजकीय आकांक्षाच्या पायी ते भेटायला गेले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती. ”
सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी आरजेडीच्या मताची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे ते लालूप्रसाद यादव यांच्याकडे गेले होते. परंतु न्यायालयीन सेवेत असणाऱ्या वरिष्ठ व्यक्तीने अशा प्रकारे आरोप सिद्ध झालेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीला भेटणे किती बरोबर आहे?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App