होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल नियमित तपासण्याची गरज असते. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आठ मुद्यांची नियमावली तयार केली आहे.Such examination of patients in home isolation Oxygen level, regulations of the Union Ministry of Health
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल नियमित तपासण्याची गरज असते. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आठ मुद्यांची नियमावली तयार केली आहे.
होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन लेव्हल तपासणे अयंत गरजेचे असते. ऑक्सिजनची लेव्हल ९४ टक्केपेक्षा कमी जाणे योग्य नसते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ऑक्सिजन लेव्हल ९४ टक्यांपेक्षा कमी झाल्यास डॉक्टरांच्या सल्याने रुग्णालयात भरती होणे आवश्यक असते.
त्याचबरोबर कोरोना रुग्णांनी ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी सहा मिनीट वॉक टेस्ट करणेही गरजेचे आहे. यामध्ये आपल्या रुममध्येच सहा मिनीटे चाला. चालणे सुरू करण्यापूर्वी एकदा आणि चालल्यानंतर अशी दोन वेळा ऑक्सिजन तपासणे गरजेचे असते.
१) ऑक्सिमीटर मध्ये बोट घालण्यापूर्वी नेल पॉलीश, कृत्रिम नखे लावली असल्यास काढून टाकावीत. हात एकमेंकांवर चोळून उबदार करावेत. २) ऑक्सिजन तपासण्यापूर्वी पाच मिनिटे विश्रांती घ्या ३) तुमचा हात छातीवर ह्रदयाच्या जवळ ठेवा. काही वेळ तसाच ठेवा ४) ऑक्सिमीटर चालू करून मधले बोट किंवा करंगळी त्यामध्ये घाला ५) ऑक्सिमीटरवरील रिडींगचा आकडा कदाचित कमीजास्त होऊ शकतो. तो स्थिर होईपर्यंत वाट पाहा. आकडा स्थिर होत नसेल तर ऑक्सिमीटर किमान एक मिनीट स्थिर ठेवा ६) ऑक्सिमीटरवरील सर्वात जास्त रिडींग किमान पाच सेकंद स्थिर राहीपर्यंत बोट त्यामध्ये ठेवा. ७) प्रत्येक रिडींग हे काळजीपूर्वक नोंदवून ठेवा. ८) दिवसातून किमान तीन वेळा ऑक्सिजन लेव्हल तपासा. ऑक्सिजन लेव्हल घरीच वाढविण्यासाठी चार-पाच उशा चेहऱ्याखाली घेऊन पालथे झोपून राहण्याचा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीत दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App