Operation Sindoor मधून भारताने केलेल्या precision attack मुळे अवघ्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाच पण त्याच वेळी पाकिस्तानने अत्याधुनिक म्हणून घेतलेल्या चायनीज बनावटीच्या शस्त्रास्त्र मालाचा बोगसपणा सगळ्या जगासमोर उघड्यावर आला. तुर्कस्तान सारख्या देशाचा ड्रोन माल “डुप्लिकेट” असल्याचा सगळ्या जगाला साक्षात्कार झाला. पण या सगळ्यामुळे चिनी बनावटी मालाच्या आणि तुर्की मालाच्या प्रेमात पडलेल्या भारतातल्या एका पक्षाची मात्र फार पंचाईत झाली, त्या पक्षाचे नाव काँग्रेस आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे आणि चीन तुर्की यांचा “डुप्लिकेट” माल उघड्यावर पडल्यामुळे काँग्रेसचे “गांधीप्रेमी” नेते फारच अस्वस्थ झाले. त्यांच्या मनाचा कोंडमारा झाला. मोदी सरकारला कुठे आणि कसं ठोकून काढू??, याची चिंता काँग्रेस नेत्यांना लागून राहिली. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी खुसपटे काढून मोदी सरकारला घेरायचा प्रयत्न केला. काँग्रेस अध्यक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन मागितले, पण त्या मागणीला शरद पवारांनी खोडा घातला.
काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तर operation sindoor च्या यशाविषयी शंका उपस्थित केल्याच, पण त्यापलीकडे जाऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांची फौज मोदी सरकारच्या यशाला बट्टा लावण्यासाठी मैदानात आणली. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावून मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह लावायला सांगितले. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार या सगळ्या माजी मुख्यमंत्री यांनी “प्रामाणिकपणे” “ते” काम केले. पण हे काम करताना त्यांच्यातले चिनी + पाकिस्तानी आणि तुर्की प्रेम उफाळून आल्याचेच समोर आले.
वास्तविक अझरबैजान, तुर्कस्तान आणि चीन यांनी पाकिस्तानला मदत केल्यानंतर अझरबैजान आणि तुर्कस्तान या देशांमधल्या पर्यटनावर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार घातला. वेगवेगळ्या टू ऑपरेटर्स त्याची पुष्टी केली. तुर्कस्तान मधले भारतीय पर्यटन 250 % घटले. कारण सर्वांनी बुकिंग रद्द केली. त्याचा आर्थिक फटका तुर्कस्तानला बसला. भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान मधल्या ड्रायफ्रूट्स आणि सफरचंदांवर बहिष्कार घातला. हे सगळे भारतातल्या जनतेने उस्फूर्तपणे केले. यात मोदी सरकारच्या अधिकृत धोरणाचा कुठला संबंध नव्हता, पण भारतीयांनी अझरबैजान आणि तुर्कस्तान यांच्यावर बहिष्कार घातल्याचे पाहून काँग्रेसने मात्र मोदी सरकारला प्रश्न विचारला, सरकारने या दोन्ही देशांशी राजनैतिक संबंध तोडून टाकलेत का??, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केला.
भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन यांचे नवे संबंध आता कसे आहेत. सरकारने अधिकृत पातळीवर या दोन्ही देशांशी संबंध ठेवण्याची “नवी संरचना” new strategy तयार केली आहे का??, असे सवाल देखील जयराम रमेश यांनी उपस्थित केले. वास्तविक कुठलेही ऑपरेशन सुरू असताना मध्येच असे धोरणात्मक सवाल उपस्थित करायचे नसतात, याचे भानही “उच्चशिक्षित” असणाऱ्या जयराम रमेश यांना उरले नाही.
ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाच पहलगाम मधला हल्ला नेमका कसा झाला??, त्यामध्ये केंद्र सरकारकडून सुरक्षा विषयक कोणत्या त्रुटी राहिल्य?, याचा तपास करण्यासाठी मोदी सरकारने समिती नेमावी, अशी मागणी अशोक गेहलोत यांनी केली. Operation sindoor अजून सुरू असताना मोदी सरकार भारताच्या विजयाचा दावा कसे काय करू शकते??, असा अजब सवाल भूपेश बघेल यांनी केला.
पण माजी मुख्यमंत्री राहिलेल्या एवढ्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्यांनी असे अजब आणि विचित्र सवाल का केले असावेत??, याचा आढावा घेतल्यानंतर एक ठळक वेगळी बाब समोर आली, ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर दरम्यान चिनी मालाचा “डुप्लिकेट” दर्जा सगळ्यात जगासमोर उघड्यावर पडला, हे काँग्रेस मधल्या हायकमांडला आवडले नाही. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने अर्थात air defence system ने चिनी रडार जाम करून पाकिस्तानात एवढे अचूक हल्ले केलेच कसे काय??, या शंकेने काँग्रेस हायकमांडचा तीळपापड झाला. मध्यंतरी राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी चिनी बनावटीच्या ड्रोन चा शो मांडून ती ड्रोन्स कशी भारी आहेत, त्याच्यातली टेक्नॉलॉजी कशी अत्याधुनिक आहे आणि भारत अशी ड्रोन्स बनवायला अजून तरी कसा सक्षम नाही, याचे वर्णन केले होते. पण प्रत्यक्षात “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान चिनी ड्रोन, चिनी विमाने, चिनी मिसाईल्स हा सगळाच माल “डुप्लिकेट” निघाला. पाकिस्तानच्या संरक्षणासाठी त्यांचा काही उपयोग झाला नाही. म्हणून काँग्रेस नेत्यांनी भडकून मोदी सरकारला घेरायचा प्रयत्न केला.
पण एवढे सगळे करूनही सगळे मूसळ केरात गेले. कारण पी. चिदंबरम आणि शशी थरूर यांच्यासारख्या दोन विद्वान काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या सगळ्या धोरणांची स्तुती करणारे लेख लिहिले. मुलाखती दिल्या. त्यामध्ये पाकिस्तानच्या आणि चीनच्या प्रापोगंडाविरोधात बिनतोड युक्तिवाद केला. त्यामुळे “गांधीनिष्ठ” काँग्रेस नेत्यांची पुरती कोंडी झाली. या दोन्ही नेत्यांची मते खासगी असल्याचा खुलासा जयराम रमेश यांना करावा लागला, पण तो राजनैतिक धोरणाच्या पातळीवर खरा ठरला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App