प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची घोषणा केली आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शालेय वर्षापासून पुस्तकांसोबच वह्या देखील मोफत देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. Students now get free books along with books
केसरकरांची घोषणा
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टक-यांना आपल्या मुलांसाठी वह्यांचा खर्चही करणे शक्य नसते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांसोबतच वह्यांची पाने देखील जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात, असेही दीपक केसरकर यांनी याआधी म्हटले होते. राज्यातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून याकडे शिक्षकांनी पहावे, असे आवहन त्यांनी केले होते. पण आता थेट वह्या देखील मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे समायोजन होणार
तसेच काही दिवसांपूर्वी केसरकरा यांना राज्यांतील शाळा बंद होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अमूक एका शाळेत शिक्षण घेतले तरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते असे नाही. त्यामुळे शाळा बंद पडल्या तरी त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन आसपासच्या शाळांमध्ये करण्यात येईल. त्यांना शाळेत जाणे लांब पडत असल्यास त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, असे केसरकर त्यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App