Bhiwandi : भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; परिसरात काही काळ तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Bhiwandi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भिवंडीच्या ( Bhiwandi )   वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबविली आहे.

दरम्यान कामवारी नदीकडे मिरवणूक जात असताना रात्री 1 वाजता मुर्तीवर अचानक दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिस्थिती चिघळली असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तर दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत.



पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

मिळालेल्या माहितीनुसार खबरदारी म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री 2.30 वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. यानंतर भाजप आमदार महेश चौघुले यांनी गणपती मंडळाला भेट दिली. गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली.

काही जणांना घेतले ताब्यात

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस सुद्धा जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

Stone pelting at Ganesh immersion procession in Bhiwandi

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात