काँग्रेसला श्रेय पण पतीनंतर पत्नी मुख्यमंत्री करण्यापुरतेच महिला आरक्षण नको; मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांची स्पष्टोक्ती


वृत्तसंस्था

लखनौ : पती नंतर पत्नी मुख्यमंत्री एवढ्या पुरतेच महिला आरक्षण नको, अशी स्पष्टोक्ती मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष शाहिस्ता अंबर यांनी केली. द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत. त्या कोणत्या समाजाच्या आहेत याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, पण त्या राष्ट्रपती आहेत याचाच आम्हाला अभिमान आहे, अशी पुस्तीही अंबर यांनी जोडली. Statement by President of Muslim Women Personal Law Board

महिला आरक्षण विधेयक काँग्रेसने आणले. पण त्यावेळी आत्ता सत्ताधारी असलेल्या पक्षाने म्हणजे भाजपने विरोध केला, असा दावा अंबर यांनी केला. वास्तविक काँग्रेसच्याच मित्र पक्षाने म्हणजे समाजवादी पार्टीने त्यावेळी महिला आरक्षणाला विरोध केला होता, पण अंबर यांनी तो आरोप भाजपवर थोपविला.

देशातले सगळे राजकीय पक्ष पुरुष वादी आहेत, पण महिला आरक्षण आल्यानंतर समाजातल्या सर्व महिलांना राजकीय पक्षांनी संधी द्यावी. राजकीय पक्षांनी झेंडे लावण्यासाठी आणि खुर्च्या उचलण्यासाठी फक्त महिलांचा वापर करू नये. सिनेमाच्या हिरोईनला लोकसभा किंवा राज्यसभेत पाठवण्याऐवजी सर्वसामान्य घरातल्या महिलांना तिथे पाठवावे, अशी मागणीही अंबर यांनी केली.

अंबर यांच्या वक्तव्यातून बरीच विसंगती देखील समोर आली. एकाच वेळी त्या काँग्रेसला श्रेय देऊ पाहात होत्या आणि त्याचवेळी त्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची संधी दिल्याबद्दल मोदी सरकारची स्तुती करत होत्या आणि त्याचवेळी त्यांनी पती नंतर पत्नी मुख्यमंत्री एवढ्यापुरतेच महिला आरक्षण नको, असेही वक्तव्य केले.

Statement by President of Muslim Women Personal Law Board

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!