विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या नेत्यांनी लोचटपणाची कमाल केली असून एका बाजुला पराभव झाला म्हणून प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी झालेली असताना प्रियंका गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे.State President Expelled for Defeat, But Congratulations to Priyanka Gandhi
देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तर प्रदेशातील यशाबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे.
आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत, हेच सांगायचं आहे. त्यासाठी, काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकारी आज होणाºया बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशसारख्या खाली मैदानात मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवली. त्यामुळे, त्यांच्या कामाचं कौतूक करायचं आहे,
त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या बैठकीत मांडायचा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी चांगला स्कोप कशाप्रकारे मिळवता येईल, याबाबतही चर्चा होणार आहे.
सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं ह्रदय आहेत, कार्यकर्त्यांच ह्रदय आहेत. देशातून गांधी परिवाराला मोठी अपेक्षा आहे, आज किंवा उद्या देशात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल. 2024 मध्ये देशाच्या सत्तेत काँग्रेसच पाहायला मिळेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App