राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 12500 रुपये दिवाळी ॲडव्हान्सला मान्यता

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम अर्थात दिवाळी ॲडव्हान्स देण्यास शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० इतकी रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. State Govt Employees’ Diwali Sweet; 12500 Diwali Advance approved

उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून, १० समान हप्त्यांत परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे.

राज्य सरकारला अप्रत्यक्ष फायदा

राज्य सरकारकडून अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अग्रीम रकमेचा वापर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली.

State Govt Employees’ Diwali Sweet; 12500 Diwali Advance approved

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात