हा माझा सन्मान नाही तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलंबो : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांना श्रीलंकेने मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले. पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील संरक्षण भागीदारीवरही एक करार झाला. दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.PM Modi
त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र बनवण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि दिसानायके यांच्यात एक करारही झाला. दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे व्हर्चुअली उद्घाटनही केले.
शनिवारी श्रीलंकेत पंतप्रधान मोदींना ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेत सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी आज मला श्रीलंका मित्र विभूषणया पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा माझा सन्मान नाही तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा सन्मान भारत आणि श्रीलंकेच्या लोकांमधील ऐतिहासिक संबंध आणि खोल मैत्रीचे प्रतिबिंब आहे.
पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून ४ ते ६ एप्रिल दरम्यान श्रीलंकेत आहेत. हा पंतप्रधान मोदींचा राज्य दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांचे स्वातंत्र्य चौकात राष्ट्रपती दिसानायके यांनी ऐतिहासिक आणि औपचारिक स्वागत केले. विशेष म्हणजे श्रीलंकेत पहिल्यांदाच एखाद्या परदेशी पाहुण्याला अशा प्रकारे सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे ठिकाण म्हणजे स्वातंत्र्य चौक.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App