विशेष प्रतिनिधी
चेन्नई : इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने ६ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा सलग दुसरा विजय आहे. तर हैदराबादचा सलग दुसरा पराभव आहे.SRH vs RCB IPL 2021: ‘Deadly bowling’ in thrilling match; RCB defeats Sunrisers; Second victory in a row
शाहबाज अहमदच्या एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दिशेनं असलेली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पारड्यात गेली . पहिल्या मॅचचा हिरो असलेल्या हर्षल पटेलनं शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात चांगली बॉलिंग केली. त्यामुळे बंगळुरुनं थरारक लढतीत हैदराबादचा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार खेळी करत ५९ धावा केल्या. मात्र संघातील इतर सहकाऱ्यांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅक्सवेलनंतर कर्णधार विराटने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
https://www.instagram.com/p/CNp4OucFugm/?utm_source=ig_web_button_share_sheet
हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ बळी घेत बंगळुरु संघाचे अगदी कंबरडे मोडले. त्याला रशीद खान, भुवनेश्वर आणि टी नटराजन यांनी सुरेख साथ दिली.
बंगळुरूच्या मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला २० षटकात ९ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
शेवटच्या ४ षटकात ३५ धावांची गरज असताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या तीन फलंदाजांना शाहबाज अहमदच्या एकाच षटकात गमावले.
A brilliant 50-run stand comes up between @davidwarner31 & @im_manishpandey Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/aFjuYCQGeb — IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
A brilliant 50-run stand comes up between @davidwarner31 & @im_manishpandey
Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/aFjuYCQGeb
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
राशिदचा नेत्रदीपक झेल
pic.twitter.com/VTh4SjdlwM — Cricsphere (@Cricsphere) April 14, 2021
pic.twitter.com/VTh4SjdlwM
— Cricsphere (@Cricsphere) April 14, 2021
ग्लेन मॅक्सवेलचं अर्धशतक हे आरसीबीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. मॅक्सवेलनं फोर आणि ३ सिक्सच्या मदतीनं ५९ रन काढले.बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App