मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या राज्यसभेतील विधानामुळे विरोधी आघाडीच्या सर्व मित्रपक्षांचे टेंशन वाढले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत 11.13 वाजता डेरेक ओब्रायन यांनी कुणालाही न सांगता स्वत: चर्चेसाठी तयार असल्याबाबत सांगतिले, तर विरोधक सातत्याने नियम 267 अंतर्गत चर्चेसाठी ठाम आहेत. यानंतर अध्यक्षांनी चर्चेसाठी आणखी वेळ देण्याचेही सांगितले आणि पियुष गोयल यांनीही डेरेक यांचे आभार मानले. मात्र, डेरेक यांनी अचाकन घेतलेली भूमिका पाहून सहकारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. Split in Rajya Sabha INDIA alliance TMC leaders ready for discussion on Manipur tension of opposition parties increased
मणिपूर हिंसाचारावरील चर्चेवरून राज्यसभेचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले आहे, कारण विरोधी पक्ष मणिपूरवर नियम 267 अंतर्गत चर्चा व्हावी असा आग्रह धरत आहेत. तर सरकारला राज्यसभेच्या नियम 176 अंतर्गत अल्पकालीन चर्चा करायची आहे. सूचीबद्ध कागदपत्रे सभागृहात मांडल्यानंतर अध्यक्षांनी सांगितले की त्यांना मणिपूर मुद्द्यावर नियम 267 अंतर्गत 37 नोटिसा मिळाल्या होत्या, परंतु त्यांनी स्वीकारल्या नाहीत.
टीएमसीचे वरिष्ठ नेते डेरेक ओब्रायन म्हणाले की, लोकांना मणिपूरच्या मुद्द्यावर ऐकायचे आहे आणि विरोधी पक्षांना त्यावर चर्चा करायची आहे. अडथळा संपवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी त्यांनी जोरदार बाजू मांडली. मणिपूरच्या मुद्द्यावर ६ ते ८ तास चर्चा करण्याची सूचनाही ओब्रायन यांनी केली. यानंतर टीएमसी नेत्याच्या सूचनेवर अध्यक्षांनी सभागृह नेते पीयूष गोयल यांचे मत मागवले.
पीयूष गोयल म्हणाले की डेरेक ओब्रायन यांनी चर्चेची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ते म्हणाले की मणिपूर हा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिला आहे आणि राज्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. गोयल यांनी असे सुचवले की नेते चहापानावर भेटू शकतात आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याच्या मार्गांवर चर्चा करू शकतात. सरकार मणिपूरवर चर्चेसाठी उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App