वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असलेल्या राज्यांत केंद्राची विशेष पथक रवाना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.Special teams of Center has sent to Corona growing states: Dr. Bharti Pawar; Work on the battlefield
वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, केंद्राची विशेष पथके महाराष्ट्र आणि केरळसह अन्य राज्यात प्रत्यक्ष कार्यरत झाली आहेत. आम्ही परिस्थितीचे अवलोकन करत असून राज्याकडून परिस्थितीची बारकाईने माहिती घेत आहोत.त्या म्हणाल्या, कोरोना संक्रमण वाढत असलेल्या राज्यात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत लोकांनी मास्क घालणेआवश्यक असून गर्दीत जाणे टाळावे.
पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे आवाहन
कोरोनाला रोखण्यासाठी या राज्यांनी पाच सुत्री कार्यक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यात कोरोनाची चाचणी, रुग्णाचा शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना होऊच नये म्हणून घेण्याच्या दक्षतांचा समावेश आहे. भविष्यातील धोका लक्षात घेता राज्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा ग्रामीण, निमशहरी आणि आदिवासी क्षेत्रात उभारणे काळाची गरज आहे, असे डॉ. भरती पवार यांनी स्पष्ट केले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राज्यांत करण्यात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यात महाराष्ट्र , केरळ अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगढ आणि मणिपूर या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
देशातील कोरोना
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : ३,०८,७४,३७६ नवीन रुग्ण संख्या ३७,१५४ एकूण बरे रुग्ण : ३ कोटी एकूण मृत्यू : ४,०८,७६ ( मृतांमध्ये नवीन ७२४ ) एकूण लसीकरण : ३७.७३ कोटी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App