वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??

Mallikarjun Kharge

नाशिक : वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच बदनामी का करता??, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केला खरा, पण हा सवाल करून त्यांनी पंडित नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्याऐवजी अख्खी काँग्रेसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली.

वंदे मातरमला राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसदेत चर्चा सुरू असताना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीकेची झोड उठवली. पंडित नेहरू बॅरिस्टर जिना यांच्यापुढे झुकले. मुस्लिम लीच्या हट्टामुळे वंदे मातरम म्हणणे बंद केले. त्यामध्ये काटछाट करून ते म्हटले गेले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाकीच्या भाजपच्या नेत्यांनी केला.

– प्रियांका गांधींचा आक्षेप

त्यावर काल लोकसभेतच खासदार प्रियांका गांधी यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. नेहरूंनी केलेल्या चुकांची एकदा यादी करा आणि त्या यादीवरच चर्चा होऊ द्या. एकदाचा हा विषय मिटवून टाका, असे आव्हान प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला दिले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढी वर्षे पंतप्रधान आहेत तेवढीच वर्षे पंडित नेहरू तुरुंगात होते, याची आठवण करून दिली.

– मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

पण त्यापुढे जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंनाच का टार्गेट करता??, असा सवाल केला. राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, वंदे मातरमची पहिली दोन कडवीच काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटली जावीत, असा ठराव संपूर्ण काँग्रेस कार्यकारणीने केला होता. त्यामध्ये पंडित नेहरू एक नेते होते, पण त्यांच्याबरोबरच महात्मा गांधी, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत हे सुद्धा काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य होते. संपूर्ण काँग्रेस कार्यकारणीनेच वंदे मातरमची दोन पहिली कडवी काँग्रेसच्या अधिवेशनात गायली जावीत, असा ठराव केला होता. मग त्यासाठी तुम्ही एकट्या पंडित नेहरूंनाच कसे जबाबदार धरू शकता??, कारण वंदे मातरम संदर्भातला निर्णय हा काँग्रेस कार्यकारिणीचा सामूहिक निर्णय होता, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

– अख्खी काँग्रेसच आरोपीच्या पिंजऱ्यात

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यातून पंडित नेहरूंचा बचाव जरूर केला. परंतु पंडित नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्याऐवजी त्यांनी संपूर्ण काँग्रेस कार्यकारणीलाच त्याचबरोबर महात्मा गांधींपासून ते सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत सगळ्याच नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना पंडित नेहरूंसकट बाकीच्या काँग्रेस पक्षाला अख्ख्या काँग्रेस पक्षाला ठोकून काढायची जोरदार संधी मिळाली. पण त्यामुळेच आजच्या राजकीय धबडग्यात मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या बुजुर्ग अनुभवी आणि चाणाक्ष नेत्याला पंडित नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्या बाहेर काढायचे होते की संपूर्ण काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलायचे होते??, असा असा कळीचा सवाल तयार झाला.

Speaking in Rajya Sabha in debate on ‘Vande Mataram’, LoP Mallikarjun Kharge

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात