विशेष प्रतिनिधी
कल्याण : काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना पंतप्रधान मोदी टप्प्याटप्प्याने वेगवेगळे मुद्दे काढून काँग्रेसला घेरत आहेतच, पण आज सायंकाळी कल्याणच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा पुन्हा एकदा जनतेसमोर आणला. काँग्रेसचा शहजादा महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांचा अपमान करतो. त्यांच्या अपमानावर नकली शिवसेनेचे आणि नकली राष्ट्रवादीचे नेते गप्प बसतात. मी त्यांना आव्हान देतो, हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेसच्या शहजाजाच्या तोंडून सावरकरांविषयी पाच चांगली वाक्य बोलून दाखवावीत. हेच आव्हान मी नकली राष्ट्रवादीच्या नेत्यालाही देतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचेही वाभाडे काढले.Speak 5 sentences well about Savarkar from the mouth of Congress princess; Thackeray – Pawar’s challenge from Modi’s Kalyan!!
नाशिक मधल्या दिंडोरी मध्ये आणि ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण मध्ये मोदींच्या जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची आणि राहुल गांधींच्या वेगवेगळ्या वक्तव्यांची चिरफाड केली. राहुल गांधींनी पुण्यातल्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान केला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले होते. त्यावरून काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्रात संताप उसळला होता. या विषयाचा देखील मोदींनी आपल्या कल्याण मधल्या भाषणात उल्लेख केला.
कल्याणच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले देशाच्या बजेटमध्ये देखील हिंदू – मुसलमान असा भेदभाव राखण्याच्या मनसुबा ठेवत आहेत. देशाच्या संपूर्ण बजेट मधली 15 % रक्कम फक्त मुसलमानांसाठी खर्च करण्याचा त्यांचा इरादा आहे. हा इरादा मी मुख्यमंत्री असल्यापासून सातत्याने हाणून पाडला. परंतु अजूनही काँग्रेस त्या इराद्यापासून दूर हटलेली नाही. त्यांना देशातल्या संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा फक्त मुसलमानांना प्रदान करायचा आहे. ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाचा वाटा त्यांनी कर्नाटकात मुसलमानांना दिला आणि आता बजेटमध्ये देखील हिंदू – मुसलमान असा भेद करून काँग्रेसवाले मुसलमानांना ज्यादा वाटा द्यायला निघाले आहेत. परंतु मोदी जिवंत असेपर्यंत हे घडू देणार नाही!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिघांवरही निशाणा साधला. काँग्रेसचा शहजादा महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो. त्यावेळी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाले लोक तोंडाला कुलूप लावून गप्प बसतात. मी त्यांना आज आव्हान देतो, त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेसच्या शहजादाच्या तोंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी पाच वाक्य चांगली बोलून दाखवावीत!! पण नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे नेते ही हिंमत करणार नाहीत. कारण त्यांचे सगळे राजकारणच फक्त तुष्टीकरणाभोवती फिरते आहे. पण मोदी या तुष्टीकरणाला एक्स्पोज केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोदींनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App