अंतिम फेरीच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युरो चषक 2024 च्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला आहे. स्पेनने चौथ्यांदा युरो कप जेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे. अंतिम फेरीच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.Spain beat England to win the Euro Cup for the fourth time and created history
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला निको विल्यम्सने गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. कोल पामरच्या गोलमुळे इंग्लंडने सामना बरोबरीत आणला. पण सामना संपण्याच्या 4 मिनिटे अगोदर ओयारझाबालने गोल नोंदवत स्पेनला विक्रमी चौथ्यांदा युरो चॅम्पियन बनवले.
दोन्ही संघांच्या प्रयत्नानंतरही पहिला हाफ गोलशून्य राहिला. सामन्यातील तिन्ही गोल उत्तरार्धात झाले. अत्यंत सावध पहिल्या हाफनंतर जिथे स्पेनचा सर्वाधिक ताबा होता आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडे केवळ आक्रमणाचाच पर्याय होता. उत्तरार्धात खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर, स्पॅनियार्ड्सला कोंडी सोवडण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागली.
लमिन यामलला उजवीकडे जागा मिळाली आणि त्याने सहकारी विंगर निको विल्यम्सला क्रॉस दिला, ज्याने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. इंग्लंड सलग चौथ्या वेळी मागे पडला. यानंतर स्पेनने अनेक आक्रमण करत इंग्लंडची बचाव फळी मोडून काढली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App