वृत्तसंस्था
श्रीनगर – जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून नियमितपणे येणाऱ्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलेल्या बातम्यांपेक्षा एक वेगळी बातमी आली आहे. राज्याच्या प्रशासनाने दहशतवादी कारवाया मूळापासून उखडण्याचा प्रयत्न केला आहे. टेरर फंडिंगमध्ये सापडलेल्या ११ कर्मचाऱ्यांना काश्मीरच्या प्रशासनाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. Sons of most wanted terrorist and founder of the terror outfit, Hizbul Mujahideen founder Syed Salahudin among those dismissed from service by J&K govt.
आश्चर्य म्हणजे या बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काश्मीरमधून पाकिस्तानात पळून गेलेला दहशतवादी आणि हिज्बूल मुजाहिदीन संघटनेचा संस्थापक म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याच्या दोन मुलांचाही समावेश आहे. सलाउद्दीनचे सय्यद अहमद शकील आणि शाहीद युसूफ हे दोन्ही मुलगे काश्मीर प्रशासनात कर्मचारी म्हणून वर्षानुवर्षे काम करीत होते. पगार घेत होते आणि दहशतवाद्यांना पैसा पुरविण्यात आघाडीवर होते.
काश्मीरमध्ये विविध दहशतवादी कारवाया करून सय्यद सलाउद्दीन पाकिस्तानात पळून देखील गेला. तरीही त्याची दोन्ही मुले काश्मीरच्या प्रशासनात सुखनैव काम करीत होती. पगार खात होती. त्यांच्यावर गेल्या १५ वर्षांमध्ये कोणतीही कारवाई झाली नाही. या १५ वर्षांमध्ये ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींची सरकारे काश्मीरवर राज्य करून गेली आहेत. मध्ये दोन वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझादांचे सरकार होते. परंतु, कोणत्याही सरकारच्या काळात सलाउद्दीनच्या मुलांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
आता ३७० कलम हटविले. जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. त्याबरोबर तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या आखत्यारित आले. तेथे प्रशासकीय साफसफाईचे काम जोरात सुरू झाले आहे. याच साफसफाईतून सलाउद्दीनचे मुलगे सय्यद अहमद शकील आणि शाहीद युसूफ यांना राज्य सरकारच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
त्यांच्या बरोबरच एकूण ११ कर्मचाऱ्यांना काश्मीरच्या प्रशासनातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांचेही उद्योग दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचे आणि अन्य मदत करण्याचेच चालू होते. त्यांना आधी कोणी रोखत नव्हते. पोलीस, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास आदी खात्यांमध्ये काम करताना ते सरकारी पगार खाऊन दहशतवाद्यांशी संबंध ठेवून होते. दहशतवाद्यांना विविध मार्गांनी फंडिंग कऱण्यात त्यांचा हात राहिला आहे. मात्र, आजच्या बडतर्फीच्या कारवाईमुळे या सगळ्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
11 J&K govt employees sacked for terror links includes two teachers from Anantnag found involved in anti-national activities and two police constables who supported provided inside information to the terrorists: Sources — ANI (@ANI) July 10, 2021
11 J&K govt employees sacked for terror links includes two teachers from Anantnag found involved in anti-national activities and two police constables who supported provided inside information to the terrorists: Sources
— ANI (@ANI) July 10, 2021
Sons of most wanted terrorist and founder of the terror outfit, Hizbul Mujahideen founder Syed Salahudin among those dismissed from service by J&K govt. Sons, Syed Ahmad Shakeel and Shahid Yousuf were also involved in terror funding: Sources — ANI (@ANI) July 10, 2021
Sons of most wanted terrorist and founder of the terror outfit, Hizbul Mujahideen founder Syed Salahudin among those dismissed from service by J&K govt. Sons, Syed Ahmad Shakeel and Shahid Yousuf were also involved in terror funding: Sources
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App