वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वडिलांनी भूषविलेले पद आता मुलगाही भूषवणार आहे. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आता आपले वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. Son’s Footsteps in Father’s Footsteps; Justice Dhananjay Yashwant Chandrachud will become the 50th Chief Justice of the country today

सरन्यायाधीश यू. यू लळीत 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त झाले. त्यांनी आधीच न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून सरकारला पाठवले आहे. त्यानुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीश पदी नेमणूक केली. आज त्यांचा शपथविधी आहे.

सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे. ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ असल्याने त्यांच्याच नावाची शिफारस झाली. त्यांचा कार्यकाल 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांचा असणार आहे.

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश होते. दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी सरन्यायाधीश पद भूषविले होते. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 असे तब्बल साडेआठ वर्षे ते भारताचे सरन्यायाधीश होते. भारताच्या आत्तापर्यंतच्या सरन्यायाधीशांमध्ये सर्वाधिक काल सरन्यायाधीश पद भूषविलेले ते पहिले सरन्यायाधीश ठरले होते.

Son’s Footsteps in Father’s Footsteps; Justice Dhananjay Yashwant Chandrachud will become the 50th Chief Justice of the country today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात