वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सर्व प्रदेशांमध्ये जाऊन काँग्रेस फोडत असताना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा आक्रमक राजकीय बाज कमी झालेला नाही. Sonia-Priyanka aggressive despite Congress split; Priyanka to launch new attack from Yogi’s Gorakhpur !!
उलट प्रियांका गांधी आता अधिक आक्रमकतेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधून नवा हल्लाबोल करणार आहेत, तर सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या सर्व सरचिटणीसांची आणि प्रदेश प्रभारींची बैठक घेऊन कोणत्याही स्थितीत काँग्रेसमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. भाजपवर आणि संघावर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसला आपल्या जुन्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणावर मजबुतीने उभे राहावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
प्रियांका गांधी येत्या 30 ऑक्टोबर रोजी गोरखपूर मध्ये मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील. या सभेचे नावच मुळी त्यांनी “प्रतिज्ञा रॅली” असे ठेवले आहे. या प्रतिज्ञा रॅलीतून प्रियांका गांधी तेथील जनतेला योगी आदित्यनाथ सरकार उखडून टाकण्याची आणि काँग्रेसचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन करण्याची प्रतिज्ञा देतील. जोपर्यंत उत्तर प्रदेशातून भाजपला संपूर्णपणे नामोहरम करणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञा प्रियंका गांधी यांनी आधीच केली आहे. आता प्रत्यक्ष योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपुर मधून त्या सरकार विरोधात हुंकार भरणार आहेत आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मात्र भाजपवर तोंडी हल्ला करत असताना प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडत आहेत. कालच त्यांनी उत्तर प्रदेश मधल्या पूर्वांचल मधील दोन नेत्यांना काँग्रेसमधून फोडून आपल्या तृणमूळ काँग्रेसमध्ये घेतले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी कार्यकारी अध्यक्ष कै. कमलापती त्रिपाठी यांचे नातू राजेशपती त्रिपाठी आणि पणतू ललितेशपती त्रिपाठी यांना तृणमूल काँग्रेस मध्ये खेचून घेतले आहे.
परंतु या पक्षफुटी कडे लक्ष न देता सोनिया आणि प्रियांका गांधी मात्र आक्रमकतेनेच काँग्रेस पक्ष चालवताना दिसत आहेत. त्यामुळेच सोनियांनी पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे, तर प्रियांका गांधी यांनी योगींच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात हुंकार भरण्याचे ठरविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App